जत हायस्कूल, जत 🙋 शैक्षणिक सहल 💐

वंदनीय सिंहासनाचे स्थान

(Place of Royal Throne)

"या युगी सर्व पृथ्वीवर म्हेंच्छ बादशहा मऱ्हाटा पातशाहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही. "

- सभासद बखर

ज्येष्ठ शु. १३, दि. ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवरायांनी स्वतःस राज्याभिषेक करुन घेतला. अवघा महाराष्ट्र आनंदाने मोहोरुन उठला. हिंदुस्थानाच्या इतिहासात हजारो वर्षात स्वतःचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले. त्याच दिवसापासून राज्याभिषेक शकाची निर्मिती करुन छत्रपती शिवरायशककर्तेही झाले. शालिवाहनानंतर स्वतःचा शक निर्माण करणारा भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील हा पहिला राजा. या घटनेची स्मृती म्हणून महाराष्ट्र शासनाने पंचधातूची मेघडंबरी उभारली. अलीकडेच या मेघडंबरीला साजेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा विरासनातील पुतळा बसविण्यात आला आहे.

 जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत. माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक सहली चे आयोजन करण्यात आले.त्यानुसार विद्यार्थी,विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला.सहल विभागाचे प्रमुख:श्री.सुतार बी.ए.सर,श्री.भोंगाळे एन.डी.सर,व शाळेचे मुख्याध्यापक:श्री.होवाळे ए.बी.साहेब, पर्यवेक्षक: श्री.माळी एम.एस.सरांचे मार्गदर्शन लाभले.
 शाळेतील शिक्षक, शिक्षिकांनी सहकार्य लाभले.
🙏 राजगड 🙏
रायगडावरील होळीच्या माळावरील श्री शिवछत्रपतींचा पुतळा

(Statue of Shivchhatrapati on Holi Mal at Raigad)

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने अतिपवित्र स्थान होय. या घटनेच्या ३०० व्या स्मृतीदिनी महाराष्ट्र शासनाने ६ जून, १९७४ रोजी हा पूर्णाकृती पुतळा रायगडावर मोठ्या

या ठिकाणीच श्री शिवराय सिंहासनाधिश्वर झाले.

दिमाखात स्थापन केला.

शिवतीर्थ राजधानी रायगड

शिवतीर्थ किल्ले रायकड छ. शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला. डोंगरी हालचालीत तरबेज व गनिमी डावपेचात पटाईत अशा शिवरायांनी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आणि राजकीय घटना जमेस धरुन मोठ्या दूरदृष्टीने राजधानीसाठी रायगडची निवड केली. शिवरायांनी रायगड ही राजधानी का निवडली या संदर्भात सभासद लिहितो " राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही, आणि धोंडा थोटका, दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले तक्तास जागा गड हाच करावा" समुद्र सपाटीपासून ८८२ मी. उंचीवर असलेला रायगड मैदानी आक्रमकांच्या टप्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या आडोशाला अगदी एकाकी अशा डोंगरावर उभारलेला आहे. शिवरायांनी रायगड हे ठिकाण राजधानी म्हणून का निवडले यास आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे या गडावरील विस्तीर्ण पठार. या विस्तीर्ण अशा पठारामुळेच त्यांना नव्या राजधानीसाठी आवश्यक अशा सर्व इमारती आपल्या मनाजोगत्या उभारता आल्या. छ. शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे व त्यांच्या समाधी स्थानामुळे नतमस्तकर व्हावं असा रायगड म्हणजे शिवप्रेमींच्या व डोंगर भटक्यांच्या दृष्टीने साक्षात पंढरीच. असा हा शिवरायांची राजधानी असलेला रायगड म्हणजे हिंदुस्तानवासियांसाठी जणू तीर्थक्षेत्रच. तेव्हा येथे फिरताना त्याचे पाविक्ष्य राखणे हे आपले कर्तव्य आहे.

Comments