सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री.बी.एल.माळी यांचे निधन.....

🙏भावपूर्ण श्रध्दांजली🙏
न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड सायन्स, माडग्याळ येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री माळी बी.एल. सर यांचे आज दिनांक १९/११/२०२२ शनिवार रोजी पहाटे ०३:०० वाजता कलंबी येथे दुःखद निधन झाले आहे. अंत्यविधी आज सकाळी ०८:३० वाजता कलंबी येथे होणार आहे.त्यांच्या निधनाने माळी परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे.त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होत आहोत.ईश्वर कै. माळी बी. एल.यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.🙏💐🙏
शोकाकुल :😭😭
इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,माडग्याळ. या.जत जि.सांगली.
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री.बी.एल.माळी यांचे निधन..
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
      दि फ्रेंडस् असोसिएशन जत या संस्थेत जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.येथे क्रीडा शिक्षक सुरुवात आणि  पर्यवेक्षक , न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,माडग्याळ म्हणून सेवानिवृत्त झाले.
      विद्यार्थी प्रिय क्रीडा शिक्षक होते.  त्यांनी अनेक खेळाडू घडविलेआहेत .विद्यार्थी,  विद्यार्थिनींना तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी अनेक बक्षिसे शाळेला प्राप्त करून देण्या मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता..!
  जिल्हा परिषद सांगली आयोजित आयोजित नृत्य स्पर्धेत तालुका व जिल्हा यांची संगीताची साथ मोलाची  असे ! पूज्य साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळेचा कार्यक्रम सांगली आकाशवाणी केंद्रावर  कार्यक्रम होता. तेंव्हा त्यांनी साने गुरुजींच्या दोन गीतांना  संगीताची साथ दिली होती. सर शाळेत व बाहेर सुद्धा विनोदी, हसतमुख बोलताना सहज
विनोद करायचे,परवाच चांदणे सर हे सुद्धा विनोदी, हसतमुख आमच्या शाळेत ते दोघेजण शिक्षक खोलीत असले की मज्जा असायची.... पण दोघे आज रोजी सेवानिवृत्त झाले तरी आम्हाला त्यांच्या आठवणी आज सुध्दा आम्हांला आठविताना हसु, अश्रू डोळ्यात  आल्याशिवाय राहत नाही.  शाळेत कोणत्याही कामाला ते नेहमीच पुढे असत.एकमेकांना मदत तर नेहमीच करत असत.
    सरांना भजनाची आवड होती.ते श्री अंबाबाई मंदिर (डोंगरांवर) जत ते भजनाला नेहमी जात असत.सकाळ, सायंकाळी आरती च्या आधीच्या भजनामध्ये ढोलची,तबला,ढगा, देवीच्या सुबळ ही वाद्ये वाजवण्याची कसब त्यांच्याकडे होती. अंभग, भजन सुरांत गायन करायचे. सर आणि त्यांचे मित्र श्री.बाळासाहेब जाधव हे पण श्री अंबाबाई मंदिरात भजनामध्ये दंग होणारे मित्र आज
आपल्यामध्ये नाहीत.यांचे खूप वाईट वाटते. 
       मिरज तालुक्यातील कळंबी या गावाचे सर नोकरी निमित्त जतलाआले . आणि जतमय झाले.
जतच्या सामाजिक शैक्षणिक कामामध्ये ते सक्रीय राहिले. गावामध्ये होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेमध्ये संयोजक, पंच म्हणून त्यांनी कामे केली आहेत.
    दि  फ्रेंडस् असोसिएशन, जत या संस्थेमध्ये काम करताना विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,पालक बंधू-भगिनी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्यांचे नाते आपुलकीचे होते.
  त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली व एक मुलगा , सुन ‌‌‌‌व  नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
     आज माळी सर आज नाहीत. ही संकल्पनाच मनाला पटत नाही. माळी सर हे एक आदर्श शिक्षक, संगीतकार ,सामाजिक कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेले आहेत. ईश्वर त्यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती देवो हीच आमची विनम्र श्रद्धांजली!
🙏💐🙏💐🙏💐🙏
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Comments