महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ कोल्हापूर विभागीय सचिव म्हणून श्री सुभाष शिंदे यांची निवड! 💐💐

🔘 श्री.सुभाष शिंदे, विभागीय सचिव
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ कोल्हापूर 
🌈🔵🌈🔴🌈🔵🌈🔴🌈🔵

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ कोल्हापूर

विभागीय सचिव म्हणून सन्माननीय सुभाष शिंदे

सर यांची नियुक्ती जाहीर

सांगली... महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ संपूर्ण महाराष्ट्रातील कला शिक्षकांसाठी अविरत अतिशय चांगल्या पद्धतीने कला विषय व कला शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. या संघावर काम करण्यासाठी अनेक कला विषयासाठी लढवय्ये सोबत येण्यास तयार झाले आहेत. यात कोल्हापूर विभागीय सचिव पदी सन्माननीय सुभाष शिंदे सर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सन्माननीय प्रदेश कोषाध्यक्ष सुहास पाटील सर यांच्या मुख्य शिफारशीने प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आज घोषित केली आहे. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय प्रल्हाद साळुंखे, सन्माननीय प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद शिंदे, सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र निंबेकर, सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र इकारे, सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष माननीय महेंद्र निकुंभ, सन्माननीय महिला प्रदेश आघाडी प्रमुख, निताताई राऊत, मुंबई सन्माननीय कोषाध्यक्ष सुहास पाटील, सन्माननीय प्रदेश सह चिटणीस मोहन माने, सन्माननीय प्रदेश सदस्य विवेक महाजन, सन्माननीय रमेश तुंगार, सन्माननीय नवाब शहा. सन्माननीय धनाजी कराडे कोल्हापूर विभाग अध्यक्ष व संपूर्ण विभागीय व जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले आहे. त्यांना आज सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सागर दीक्षित सर यांच्या हस्ते देण्यात आले व सत्कारही करण्यात आला

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ


🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🌈💐🌈💐🌈💐🌈💐🌈💐

Comments