शाहिर सम्राट बापूराव विरूपाक्ष विभूते, बुधगाव यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!!

विनम्र अभिवादन!
       🔴🔴   शाहिर कलेच्या ! कोहिनूर हिरा !
शाहिर सम्राट बापूराव विभूते!!🔵🔵
   बुधगाव या सिध्देश्वराच्या पांढरीत अनेक रत्ने जन्माला आली,त्यांनी बुधगाव नागरी चे नाव अमर केले आहे.त्यामध्ये शाहिर कलेमध्ये गाव, तालुका, जिल्हा राज्य,देश नव्हे तर जागतिक पातळीवर त्यांनी शाहिरी पताका फडकत ठेवली! त्या गुरूवर्य शाहिर तिलक, कवी विशारद, शाहिर सम्राट बापूराव विरूपाक्ष विभूते यांना मानाचा मुजरा !!
 प्रतिकुल परिस्थिती मध्ये शाहिरी कला व साथीदारांना प्रशिक्षण देणे.त्यांना जपणे .पोवाडा लेखन,पाळणा गीत,भारूड,वग, विविध गाणी, त्यांचा हातखंडा होता. स्वतः चा संसार चालविता ...ना त्यांनी त्यांच्या साथीदारांचा संसाराली पण मदत केली. हे सारे आमचे आप्पा कसे करायचे हे समजणं कठीण! 
       रूबाबदार व्यक्तिमत्व!, त्यांना पाहताना आपली नजर मानाने मजुरा झुकली पाहिजेल! असं त्यांचं राहणीमान!
आप्पा यांचा पोवाडा घ्या कार्यक्रमाचा  आधी त्यांचे नियोजन खूपच सुंदर असायचं. सर्वांचा गणवेश, सर्व लागणारे साहित्य, कलाकार, यांच्या वर त्यांचे बारीक लक्ष्य असे.कार्यक्रमात संपूर्ण वेळेचे नियोजन त्यांच्या कडे असे.
    ज्यावेळी पोवाडा कार्यक्रम सुरू झाला की डफावर थाप पडली की आवाजाने वीर रसाने रसिक मंत्रमुग्ध होऊन फोडावा ऐकत बसायचे. त्यावेळी वेळेचे भान नसायचे! आवाजामध्ये चढ ...उतार... शब्दची जागा....! आणि डफावर थाप  शाहिरी कला!!! अप्रतिम शैली त्यांची होती.
अनेक शाहिरांनी कलेनी रात्रीच्या रात्री त्यांनी सजविलेल्या 
या शाहिर सम्राट बापूराव विभूते (आप्पा) तुम्ही बुधगाव या
गावाची शान वाढवली! तुम्हांला कोटी कोटी प्रणाम!!!!!
    आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!!!
🙏🌈🙏🔴🙏🔵🙏🌈🙏🔴🌈🔵🌈🙏🌈🔴🌈🔵💠 लेखन:श्री.सुभाष शिंदे, बुधगाव ता.मिरज जि.सांगली.
                            

🙏शाहिर विभूते नातू यांचे मनोगत!
🔴🔴🔵 शाहिर सम्राट बापूराव विरूपाक्ष विभूते यांच्या
जीवनात काही प्रसंग मी अनुभवले आहेत.आमचे
आप्पा (शाहिर सम्राट बापूराव विभूते) यांचा सहवास
मला लाभलेला आहे.कारण माझे हार्मोनियम वादक म्हणून
आप्पा यांच्या कार्यक्रमांला साथीदार म्हणून कार्यरत होते. पुढील भागात लेखन
करणार आहे.💠 पुढील भाग नक्कीच वाचा हो.......🙏🙏👍🔴🔴🔴🙏🙏🙏🔴🙏🙏💐💐💐💐💐💐💐🌼

Comments