श्री.सर्जेराव जगन्नाथ चांदणे सेवानिवृत्त शिक्षक यांचे निधन
दि फ्रेंड्स असोसिएशन,जत परिवारातील सर्व शाखेत कार्य केलेले माजी सह शिक्षक श्री. सर्जेराव जगन्नाथ चांदणे सर यांचे आज नुकतेच निधन झाले. एक हाडाचा विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नाव लौकिक प्राप्त केला होता. त्यांच्या निधनाने चांदणे परिवारावर दु:खाचा आघात झाला आहे .आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी होत आहोत .मृत चांदणेसर यांच्या आत्म्यास ईश्वर चरणी चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून दि फ्रेंड्स असोसिएशन,जत व जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत .
मुख्याध्यापक / पर्यवेक्षक
सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका व शिक्षकेत्तर सेवक .
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स ,जत .
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐😭😭😭😭😭😭
शुक्रवार,दि.२१ ऑक्टोबर २०२२रोजी सायंकाळी -४.३० वाजता श्री सर्जेराव जगन्नाथ चांदणे (वय-६७) यांचे दु:खद निधन झाले आहे.
दि फ्रेंडस् असोसिएशन जत सर्व शाखेमध्ये सेवा करणारे अत्यंत विद्यार्थी प्रिय शिक्षक होते .विनोदी ,हसतमुख स्वभावामुळे शाळा व परिसरामध्ये मध्ये ते प्रसिद्ध होते.
शिक्षक पेशामध्ये असताना त्यांनी विविध उपक्रम राबवले. शैक्षणिक उपक्रमामध्ये कविता ,नाट्यप्रयोग एक नाट्य प्रयोग व विविध व्यक्तिरेखा सादर करण्यासाठी त्यांच्या व्यतिरिक्त मुळे जो प्रसंग उभे व करण्यास मदत झाली . त्यांना फोटोग्राफीची आवड होती . त्यामुळे शाळेतील शैक्षणिक व सामाजिक परिसरामध्ये होणारे विविध कार्यक्रम त्यांची फोटोग्राफी सुयोग्य प्रकारे करीत असत. त्या काळी फोटोग्राफर मिळणे मुश्किल होते. त्यावेळी गरीब व्यक्तींना अल्प किमतीमध्ये फोटो काढून देत असत.
दोन मुले व एक मुलगी यांना शिक्षण व त्यांचं सर्व काही त्यांनी पार पाडले आहे .सौ. चांदणे सरांच्या प्रत्येक सुख दुखात साथ दिली सरांचे जीवन कष्टमय असेच होते पण या कष्टामध्ये आनंदी राहून जीवन कसे जगावे हे त्यांच्यापासून पहावे असे वाटते कोणतेही संकट आलं की ते ध्येयाने सामोरे जायचे संसारात येणाऱ्या सर्व संकटावर मात करून सर श्री चांदणे सर सेवानिवृत्त झाले होते .सर्व काही व्यवस्थित चाललेले होतं अलीकडेच त्यांना कॅन्सरचा रोग जडला, ऑपरेशन पण झाले होते .औषध उपचार सुरू होता. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न सर करीत होते .पण ईश्वराच्या मनात काय आहे ...हे कुणाला सांगता येत नाही. एक हसतमुख व्यक्तिमत्व श्री.चांदणे सर ! काळाच्या पडद्याआड गेले ...श्री . चांदणे सर यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो ! हीच आमची भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच आमची भावपूर्ण श्रद्धांजली!
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
O
Comments
Post a Comment