चित्रकर्ती सौ. वैशाली पाटील, चित्रकार श्री.बाळासाहेब पाटील यांच्या चित्रकलाकृतीचे प्रदर्शनाचे उद्घाटन....!

🌈🔴🌈🔴🌈🔴🌈🔴🌈🔴🌈🔴🌈🔴🌈🔴🌈🔴
सांगलीतील आर्ट गॅलरीचा विषय मार्गी लावू 

-- डॉ. राजा दयानिधी

💠वैशाली पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼

सांगली, दि. १५ ऑक्टोंबर २०२२.

सांगली शहरात आर्ट गॅलरीची गरज असून हा विषय लवकरच मार्गी लावला जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.

 प्रसिध्द चित्रकार वैशाली पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते संपन्न झाले. इंजिनीअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या या प्रदर्शनाचे आयोजन आभाळमाया फाउंडेशनने  केले आहे.

यावेळी डॉ. दयानिधी यांनी प्रदर्शनातील सर्व ११० चित्रांची पाहणी केली. प्रत्येक चित्र समजून घेतले. चित्रातील निसर्गाचे सुलभिकरण, मिथकांची भाषा या गोष्टीही त्यांनी समजून घेतल्या, तसेच वैशाली पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या चित्रांची प्रशंसा केली.

यावेळी आभाळमाया फाऊंडेशनचे संचालक आणि ज्येष्ठ वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, पाटील दाम्पत्याच्या या चित्रांचे प्रदर्शन पुढील महिन्यात मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे. त्याआधी सांगलीकर रसिकांसाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ते आज आणि उद्या चालू राहणार आहे.
 
 चित्रकार सुरेश पंडीत यांनी वैशाली पाटील आणि  बाळासाहेब पाटील यांच्या चित्रांची शैली विषद केली. वैशाली पाटील यांच्या चित्रांमध्ये परंपरा, रंगसंगती याचा अपूर्व मिलाफ आहे, ग्रामीण लोकसंस्कृती आणि त्यांचे जीवन त्यांच्या चित्रांतून दिसते. बाळासाहेब पाटील यांच्या चित्रांमध्ये भौमितिक आणि त्रिमितीय आकार ही वैशिष्ट्ये दिसून येतात.

बाळासाहेब पाटील म्हणाले,  सांगलीमध्ये सुसज्ज आर्ट गॅलरी व्हावी. ही सांगली जिल्ह्यातील चित्रकारांची गरज आहे. त्यामुळे प्रदर्शने भरवता येतील. 

यावेळी इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन वीरकुमार मेहता आणि प्रेसिडेंट जितेंद्र कोळसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आर्टिस्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष शशिकांत तथा संजय हिरेकर संस्थापक लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदीप बापू वाले  सौ. हेमाताई चौगुले,  गौतमीपुत्र कांबळे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दादा भगाटे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी,   अनेक आर्किटेक्ट, इंजिनिअर्स तसेच कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
🔴🌼💐🔴🌼💐🔴🌼💐🔴💐🔴🌼💐🔴🌼💐
💐💐💐🌈🌈💐हार्दिक अभिनंदन💐🌈🌈💐💐💐
🔴💠💠💠🌼चित्रकार सौ.वैशाली पाटील,श्री.बाळासाहेब पाटील व श्री. सुभाष शिंदे...
,
💠 डॉ. दयानिधी यांनी प्रदर्शनातील सर्व ११० चित्रांची पाहणी केली. प्रत्येक चित्र समजून घेतले. चित्रातील निसर्गाचे सुलभिकरण, मिथकांची भाषा या गोष्टीही त्यांनी समजून घेतल्या, तसेच वैशाली पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या चित्रांची प्रशंसा केली.
       या चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी श्री.राजेंद्र ठोके, उपाध्यक्ष,श्री.सुभाष शिंदे, कार्यवाह,श्री.सुहास साने ,चित्रकार यांनी भेट दिली.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴


 सौ.वैशाली पाटील,श्री.बाळासाहेब पाटील यांच्या चित्र प्रदर्शनास भेट दिली.सर्व कलाकृती  मनमोहन,अंतरी मनातील भावना, सुंदर विषयानुसार रंगछटा अद्भुत  सौ.,श्री.पाटील चित्रकाराने हार्दिक अभिनंदन!
  पुढील मुंबई येथील चित्र प्रदर्शन हार्दिक शुभेच्छा!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐





Comments