जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत मध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्ररेणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
💫💐💫💐💫💐💫💐💫💐💫💐💫🙏🙏
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत ता.जत जि.सांगली.
डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात* आला.प्रतिमापूजन कलाशिक्षक व ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन शाखा जत चे समन्वयकयांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे* *ए .बी* ., *पर्यवेक्षक-श्री.माळी एम.एस*,श्री.पी एम. कांबळे,श्री .एन .डी.कांबळे,श्री.तंगडी एल.सी.,श्री.जोशी ए एस. तांत्रिक विभागाचे श्री.हिरेमठ व्ही. आर. सर व विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक वृंद उपस्थित होते..अब्दुल कलाम हे एक आदर्श शास्त्रज्ञ होते.त्यांचे गुरू इयादुराई सोलोमन यांनी कलमांना जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास हे गुण अंगी बानवण्याविषयी विशेष प्रेरणा दिली. म्हणूनच कलामांनी अनेक आपल्या कार्यातून उत्तुग कार्य करून दाखवले.त्यांना अनेक गौरव व पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांना भारताचे *मिसाईल मॅन म्हणतात.त्यांनी लिहलेली अग्नी पंख आणि प्रज्वलित मने ही पुस्तके विद्यार्थांना विशेष प्रेरणा देणारी आहेत.म्हणून विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे आवाहन मुख्याध्यापक श्री .होवाळे ए.बी .सर मनोगतातून केले, व सर्वांना वाचन प्रेरणा दिवस व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे कलाशिक्षक श्री सुभाष शिंदे यांनी वाचन दिनानिमित्त आकर्षक फलक लेखन केले होते.शाळेचे पर्यवेक्षक श्री माळी एम एस. सर व शाळेतील सर्व अध्यापक,अध्यापिका व शिक्षकेतर सेवक वृंद तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment