जत कन्या केंद्र: शिक्षण परिषद श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज जत संपन्न...!
गुरुवार दि.13/10/2022रोजी जतकन्या केंद्रात झालेल्या शिक्षणपरिषदेत सौ.सुजाता मुरगेंद्र दुगाणी .सहशिक्षिका बालविद्यामंदिर जत यांनी नमुना पाठ सादर केला .मराठी विषयाचा पद्यपाठ होता .भेळ ही कविता होती.त्यांनी चालीमध्ये गाऊन दाखवली. प्रत्यक्ष साहित्य वापरून भेळ तयार करण्यात आली. अध्ययन निष्पत्तीचेही स्पष्टीकरण दिले गाभाघटक, राष्ट्रीय मुल्ये या पद्यातून जोपासली जाऊ शकतात याचे स्पष्टीकरण दिले. 02,01,07या अध्ययन निष्पत्तीनुसार खाली कवितेच्या ओळी सांगितल्या-स्वच्छतेचे नियम पाळा रोगराईला घालू आळा
उघड्यावरची खाऊ नका भेळ
तुमच्या पोटाचा बिघडेल ताळमेळ
अशा रीतीने अतिशय सुंदर नमुना पाठ सादर केला.
💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐
Comments
Post a Comment