राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती समारंभ पूर्वक साजरी करण्यात आली!!

जत हायस्कूल, जत मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली !!    
                      इयत्ता सहावी तुकडी- मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व वर्गशिक्षिका -सौ. एन .एन. सूर्यवंशी मॅडम यांनी जयंतीच्या कार्यक्रमांचे नियोजन केले होते . विद्यार्थ्यांमध्येच अध्यक्ष, वक्ता, निवेदक अशा विविध स्वरूपाचे विद्यार्थ्यांमधूनच सादरीकरण करण्यात आले .भाषण , गायन  याव्रादारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंग ,माहिती याचे सादरीकरण विद्यार्थी- विद्यार्थिनींनी योग्य प्रकारे सादरीकरण झाले .        या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री होवाळे ए .बी., पर्यवेक्षक श्री. माळी एम .एस .सांस्कृतिक प्रमुख श्री. अमोल जोशी यांच्या मार्गदर्शनाद्वारे कार्यक्रम योग्य प्रकारे करण्यात आले. शाळेतील शिक्षक, शिक्षिका शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी-  विद्यार्थिनी व पालक बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंग समजले .भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या लहानपणीचे प्रसंग ऐकून विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन देशातील उच्च पदावर स्थानापण पोहचता येते. याची जाणीव झाली .हा कार्यक्रम प्रेरणादायी झाला.     इयत्ता सहावी तुकडी-ब  वर्गशिक्षिका :सौ .एन .एन. सूर्यवंशी मॅडम व या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन!

Comments