शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

💠मा.श्री.एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांनी साधला शिक्षकांशी संवाद!
राज्यातील शाळेचा दर्जा वाढवतात सरकारी शाळेचे सहमुशीकरण केले जाणार आहे. पूर्व प्राथमिक स्तरावर प्राथमिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर दिला जाणार आहे. असे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सोमवारी सांगितले राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्रधान यांनी सोडवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शिक्षक दिनानिमित्त त्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानातून राज्यातील शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर सचिव रणजितसिंग देओल,संचालक कैलास पगारे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले ,महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करून देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मुलांना समान व गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत काही महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी ,अशी सूचना ही त्यांनी केली आहे.शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळेच्या समक्ष करण्याकरता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आतंरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला ,असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर सहा टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत .शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण शिक्षकाचे योग्य मूल्यमापन प्रक्रिया या सर्वच व्यक्तीचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना विचार केला आहे .संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरावर काम करेल यासाठी पोषण वातावरण निर्माण करण्यात येत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
        शिक्षक दिनानिमित्त मा. मुख्यमंत्री साहेबांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. सांगली जिल्ह्यातील स्काऊट विभागाचे प्रतिनिधित्व श्री. सुभाष शिंदे, जत हायस्कूल जत आणी गाईड विभागाचे प्रतिनिधित्व सौ. रुपाली दरुरे, डॉ. देशपांडे बालविद्यामंदिर, सांगली यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी मा. राजा दयानिधी साहेब,मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब, शिक्षणाधिकारी मा. मोहन गायकवाड साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. माधुरी गुरव मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.मा.जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Comments