स्व.अशोकदादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त: झालेल्या दादा चषक-२०२२ चित्रकला स्पर्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद!!
💠श्री.सुजय(नाना) शिंदे यांनी चित्रकला स्पर्धा संयोजक
खुपच छान व्यवस्था केली.माहिती पत्रक पासून स्पर्धा स्थळा पर्यंत प्रत्येक विद्यार्थी,विद्यार्थिनींना बैठक व्यवस्था, मोफत कागद, बालकलाकारांना खाऊ, विविध सुचनेनुसार त्यांना मदत केली.त्यांचा मित्रपरिवार सुध्दा सक्रिय होता.
चित्रकला स्पर्धा सुनियोजित होण्यासाठी कलाशिक्षक:श्री.सुभाष शिंदे,श्री.जितेंद्र शिंदे,श्री.दयानंद कोळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
🌼🌼🌼🔵🔵🔵🔵🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
🌈💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मान्यवरांचे सत्कार समारंभ
💠 ज्येष्ठ कलाशिक्षक -श्री.आर.ए.पाटील सरांचा सत्कार मा.आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत यांचा हस्ते करण्यात आला.
💠 सेवानिवृत्ती कलाशिक्षक -मा.एस.ए.नलवडे सरांचा सत्कार मा.आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
🔴🌈 मा.आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत साहेबांचा सत्कार करण्यात आला.
🔵कलाशिक्षक श्री.जितेंद्र शिंदे यांचा सत्कार मा.आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा हस्ते करण्यात आला.
🔵 कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे,जत हायस्कूल, जत यांचा सत्कार मा.आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
🔵 कलाशिक्षक श्री.दयानंद कोळेकर यांचा सत्कार मा.आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
🔴मा.आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
चित्रकला स्पर्धेत रंगलेले बालचित्रकार!!!!!
दादा चषक-२०२२चषक चित्रकला स्पर्धा!
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
जत: रविवार,दि.२५सप्टेंबर २०२२रोजी बचत भवनात स्व.अशोकदादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त:दादा चषक-२०२२ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.💠 संयोजक -सुजय (नाना) अशोकराव शिंदे मित्रपरिवार व कै.अरूण आण्णा स्पोर्टस् क्लब जत
यांनी केले होते. चित्रकला स्पर्धांचे नियोजन करण्यासाठी
कलाशिक्षक:श्री.सुभाष शिंदे,जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स जत.श्री.जितेंद्र शिंदे,श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल ज्युनि.काॅलेज जत,
श्री दयानंद कोळेकर अल्फोल्स जत.
या स्पर्धेचे एकूण पाच गट करण्यात आले होते.प्रत्येक गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना रोख रक्कम
व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या रोख रक्कम बक्षिसांचे प्रायोजक:मा. श्री .मुऩा पखाली,माजी नगरसेवक जत, मा.श्री संतोष (रायबा ) कोळी, नगरसेवक जत,मा.श्री.राजु यादव, नगरसेवक जत,मा.श्री आप्पासो पवार, उपनगराध्यक्ष जत, मा.सौ.शुभांगी बन्नेनवर, नगराध्यक्षा, नगरपरिषद,जत.होते.सर्व स्पर्धेकांना मोफत कागद देण्यात आला, स्पर्धकांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात जत चे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह दादा सावंत साहेब व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून स्व .अशोक दादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त दादा चषक !-२०२२ चित्रकला स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी जेष्ठ कलाशिक्षक श्री आर ए पाटील सर श्री संजीव नलावडे सर श्री सुभाष शिंदे श्री जितेंद्र शिंदे श्री दयानंद कोळेकर व जतच्या प्रथम नागरिक माननीय सौ . शुभांगी बन्नेनवर, बाबासाहेब कोडक साहेब ,मा.सरदार पाटील,सर्व पत्रकार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमा वेळी नाना शिंदे यांनी स्वर्गीय अशोक दादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा संकल्पना व्यक्त केली .स्वर्गीय दादा यांच्या जीवनातील आठवणी सांगितल्या या कार्यक्रमासाठी माननीय आमदार श्री विक्रम सिंह दादा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ कलाशिक्षक श्री आर. ए. पाटील सर, श्री.संजीव नलवडे सर ,श्री सुभाष शिंदे सर ,श्री जितेंद्र शिंदे सर व श्री दयानंद कोळेकर सर यांचा सत्कार माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत,साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. जत तालुक्यामध्ये आजवर ज्या चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या ! पण या स्पर्धेने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे !! या स्पर्धांमध्ये एकूण पाच गटांमध्ये एकूण 950 पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभाग नोंदविंला, याशिवाय गट क्रमांक -०५ खुला गट विविध पालकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यातून कला विश्व महाविद्यालय तील विद्यार्थ्यांनी पण जतच्या या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,पालक बंधू भगिनीं यांचा पाठिंबा उत्स्फूर्त होता. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपल्या कलेचे विविध गुणांचे दर्शन प्रकट केले. .या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. .ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व कलाशिक्षक सुजय (नाना )शिंदे मित्र मंडळ जत यांचा सिंहाचा
वाटा आहे.
यावेळी पालक बंधू भगिनीं, मान्यवर पत्रकार, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
💠🌼💠🌼💠🌼💠🌼💠🌼💠🌼💠🌼💠🌼💠🌼
🌈🔵🌈💐🌈🔴💐🌈💐🔴🌈🔵💐🌈💐🌈
एक सुवर्णक्षण!!
भव्य चित्रकला स्पर्धा जत तालुका मध्ये आयोजित केलेल्या होत्या बक्षिस वितरण समारंभाचे मा.श्री.अशोकदादा शिंदे अध्यक्ष होते. 💠 मा.श्री.अशोकदादा शिंदे यांच्या सत्कार जत तालुका कला व्यापक संघाचे अध्यक्ष श्री . सुभाष शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून केला.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
जत तालुक्यात कलेसाठी दादा नी सदैव प्रयत्न केले होते.
विविध स्पर्धांचे आयोजन करून, कलावंताना प्रेरणा देण्याचे
काम त्यांनी केलं! चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, गणपती उत्सवात विविध डेकोरशेन स्पर्धा,जत शहरात त्यांनी त्यावेळी उपक्रम राबविले होते.या विविध ग़ोष्टीची आठवण आज स्पर्धेच्या निमित्ताने आज मला होत आहे! मा.श्री.सुजय (नाना) अशोकराव शिंदे यांनी हा वसा मा.अशोकदादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त कलेला प्रेरणा उपक्रम हा राबविण्यात आला .याचे हार्दिक अभिनंदन,! 🌈🌈🌈🌈🌈🔵 -श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.ता.जत.जि.सांगली.
🙏💠🌼🙏💐💠🌼🙏💐🌼🙏💐🌼🙏💐🌼🙏
Comments
Post a Comment