स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे:एक आदर्श व्यक्तिमत्व!
जिल्हा-सांगली

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत ता.जत जि.सांगली.
श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर ्
कला !देवीचा साक्षात्कार होण्यासाठी कलाकाराकडे सच्चे जिगर असावे लागते.
शालेय जीवनातच चित्रकलेची मैत्री करून
कलाविश्वात आपला वेगळाच ठसाज्ञउमविणारा एक अवलिया जत मध्ये वावरत आहे. कलेला परमेश्वर मानून तिचीपूजा करणाऱ्या त्या सच्चा कलाउपासक्राचे नाव आहे.
🔵सुभाष सदाशिव शिंदे 🔵
शिंदे हे सध्या जत मधील दि फ्रेंड्स असोसिएशन, जतच्या जत हायस्कूल 'कलाशिक्षक ' म्हणून कार्यरत आहेत.जिद्द आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कला क्षेत्रात गरुड भरारी घेतलेल्या आपल्या यशस्वी विद्यार्थ्याची माहिती शिंदे यांचे मार्गदर्शक डॉ.श्रीपाद जोशी अभिमानाने सांगत होते.ते पुढे म्हणाले सुभाष चे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण बुधगावमधील बुधगाव हायस्कूल बुधगाव मध्ये झाले. सुभाषला लहानपणापासून चित्रकलेबद्दल विशेष आकर्षण होते.त्याचे वडील हार्मोनियम वादक होते.त्यामुळे बालवयापासून सुभाष कलेच्या वातावरणात वाढत होता.सुभाष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.मात्र चित्रकलेची आवड सुभाषला गप्प बसू देत नव्हती. सुभाषने चित्रकलेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. सांगलीतील शांतिनिकेतन मधील कलाविश्व महाविद्यालय सन १९८७ मध्ये सुभाष एइ.टी.डी.हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाला.त्यानंतर सन -१९८९बी.फोटो व २००१ मध्ये ए.एम.पदवी संपादन केली. सन -१९९१ मध्ये जत येथील जत हायस्कूलमध्ये पूर्णवेळ कलाशिक्षक म्हणून रुजू झाला.सुभाषची जन्मभूमी 'बुधगाव ' पण 'कर्मभूमी 'जत' झाली.
शिक्षक म्हणून एकदा नोकरी मिळाली की बऱ्याच वेळा कलाशिक्षकांचे खडू,फळा, पेन्सिल, कॅनव्हास व रंगाशी असलैले नाते तुटूत जाते.परंतु कलेचा सच्चा उपासक असलेल्या सुभाष शिंदेंच्या बाबतीत काही वेगळेच घडले.नोकरी मिळाल्यानंतरही कलेतील वेगळेपण जपत शिंदे यांनी कलेचा जागर अखंडित ठेवला. विद्यार्थ्यांना चित्रकलेतील सोप्या-सोप्या टिप्स सांगून ते विद्यार्थीप्रिय बनले.हाताने चित्र रेखाटन करणे हे काही नवे नाही.पण तोंडाने चित्रे काढण्यात शिंदेंचा हातखंडा आहे.तोंडाने, दोन्ही हाताने , उजव्या पायाने चित्रे काढून शिंदेंनी आपले वेगळेपण जपले आहे.कलेप्रमाणे शिंदेंना कथाकथनाची आवड आहे.साने गुरुजी कथामालेत सांगली जिल्हा संघटक म्हणून त्यांनी यशस्वी काम पाहिले आहे.साने गुरुजींच्या जन्मशताब्दी निमित्त शिंदेंनी राज्यभर कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत.
कलाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल यांना १९९० मध्ये 'रचनाचित्र' राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य कला व्यापक संघातर्फे शिंदेना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.सुभाष शिंदे यांना वडील सदाशिव,आई शांताबाई, प्राचार्य -जयसिंग पैलवान, सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत माळी ,दि फ्रेंडस् असोसिएशन,जत चे अध्यक्ष गुरूमूर्ती ऐनापुरे,सचिव डॉ.मदन बोर्गीकर,जत हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.ए.मेत्री,म.ल.देसाई यांचे प्रोत्साहन लाभत आहे .
🟦 आदित्यराज घोरपडे 🔵🔵🔵थोडक्यात परिचय :🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विद्यार्थ्यांचे नाव: सुभाष शिंदे (कलाशिक्षक:जत हायस्कूल,जत)
शिक्षण:ए.टी.डी.,बी.ए.ए.एम.
🌈🏅🌈🏅🌈🏅🌈🏅🌈🏅🌈🏅🌈🏅😘🏅🌈🏅
🔵श्री.सुभाष सदाशिव शिंदे,कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत यांचा शिक्षण सेवक सहकारी लि.सांगली यांच्या ८९वा वर्धापन दिनानिमित्त आदर्श सभासद (आदर्श शिक्षक) शिक्षण सेवकपुरस्कार-२०२२ हा पुरस्कार मा.आमदार श्री.अरूण(आण्णा)लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मा. श्री.अरूण (आण्णा)लाड,आमदार त्यांच्या हस्ते पुरस्कार श्री . सुभाष शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
स्काऊट चळवळीचा वैभवशाली वारसा आणि आदर्श शिक्षकाचा गौरव
लेखक : श्री. सुभाष सदाशिव शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत, जि. सांगली
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत ही जत तालुक्यातील एक आदर्श आणि नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, संस्कार आणि विविध उपक्रमांमुळे या संस्थेने तालुक्यासह सांगली जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यालयात राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांचे अनुकरण आज जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था करीत आहेत.
या संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा वारसा म्हणजे स्काऊट-गाईड चळवळ. संस्थान काळात जत येथे स्काऊट शिबिरे भरविली जात असत. भारतातीलच नव्हे तर विविध देशांतील स्काऊट्सही या शिबिरांमध्ये सहभागी होत असत. त्या काळी जत हे सांगली जिल्ह्यातील एकमेव स्काऊट प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. या गौरवशाली इतिहासाचे पुरावे आजही कोलकाता येथील राष्ट्रीय संग्रहालयात छायाचित्रांच्या स्वरूपात जतन करण्यात आले आहेत. त्या छायाचित्रांखाली या ऐतिहासिक कार्याची माहितीही नोंदविण्यात आली आहे.
या वैभवशाली परंपरेचा एक भाग म्हणून स्काऊट मास्टर म्हणून कार्य करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला मनापासून अभिमान वाटतो. स्काऊट चळवळीने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, सेवाभाव, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचे कार्य केले आहे. हा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे.
माझ्या शैक्षणिक, सामाजिक, कलाविषयक आणि स्काऊट-गाईड क्षेत्रातील कार्याची दखल घेत शिक्षण सेवक सहकारी संस्था मर्यादित, सांगली यांच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त मला "आदर्श सभासद (आदर्श शिक्षक) शिक्षण सेवक पुरस्कार – २०२२" प्रदान करण्यात आला. हा सन्मान मा. आमदार श्री. अरुण (आण्णा) लाड यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. संदीप पाटील, संचालक, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ वैयक्तिक सन्मान नसून, तो माझ्या विद्यालयाचा, सहकारी शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा गौरव आहे.
अशा सन्मानांमुळे शिक्षक म्हणून अधिक समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते. शिक्षण, संस्कार, कला आणि स्काऊट चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याचा माझा संकल्प भविष्यातही कायम राहील. शिक्षणाची सेवा हीच माझी खरी साधना आहे, अशी भावना मनाशी बाळगून मी पुढील पिढी घडविण्याच्या कार्यात सदैव योगदान देत राहीन.
'कला '!ही मागून मिळत नसते.ती घेता येत नाही कला शिकण्यासाठी कलेबद्दल मनात भक्ती असावी लागते.

Comments
Post a Comment