असा एक कलाकार:श्री. सुभाष शिंदे !
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत मध्ये कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर,
चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साने गुरुजी कथामाला,
सेवादल, सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे कार्यावाह, सांगली जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यलय अॅड व्यास पार्टी लिडर, तसेच विविध पदांवर कार्यरत असतात, लायन्स क्लब जत मध्ये विविध पदांवर कार्यरत असतात.जत तालुका व जिल्हा व राज्यस्तरीय
चित्रकला स्पर्धांचे आयोजन असो ते सदैव तत्पर असतात.
जत सारख्या भागातून सेवेची सुरूवात करुन त्यांनी अनेक
क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
या कार्यतत्पर शिक्षकांचे नाव श्री. सुभाष सदाशिव शिंदे
आहे.सरांचे मुळ गाव मिरज तालुक्यातील बुधगाव आहे. लहानपणापासून गरीब परीस्थिती मध्ये शिक्षण घेतले.उच्च
शिक्षण घेताना रात्री दैनिक केसरी मध्ये आर्टीस्ट विभागात
काम केले.आणि सकाळी शिक्षण घेतले.त्यावेळी विविध
स्पर्धेत सहभागी होऊन अनेक बक्षिसे मिळाली.उच्च शिक्षण
पूर्ण झाल्यावर बोलवून नोकरी दिली.असे दुर्मिळ होत.पण
नोकरी सुरू झाली.पण संकटे पाठ सोडत नव्हते.पगार नव्हता.घरची गरीब परीस्थिती मुळे नोकरी सोडली.आणी
मुंबईला गेलो माझ्या बहिणीकडे तेथे नोकरी शोधायला
लागलो. माझे दाजी पोलिस सब इन्स्पेक्टर होते.त्यांच्या मित्रांच्या ओळखीने मातोश्री आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे त्यांची भेट
म्हणजे मला पंढरपूर विठ्ठल भेटल्याची जाणीव झाली.
बातचीत झाली.त्यांनी कार्यकारी संपादक श्री. अशोक पडब्रिदी कडे सामना कार्यालयात गेलो. त्यांनी आर्टिस्ट
विभागात सामना चे एक पान तयार करण्यासाठी सर्व
साहित्य दिले.आणि वेळ -४५मिनीटे दिला. मी केसरी
मध्ये ही कामे गेली होती. माझा मुंबईतील नोकरी मधला
हा नविन सुरुवात मी मनात ईश्वराचे स्मरण केले. आणि
सुरुवात केली. २५मिनिटात पानांचे आर्टवर्क तयार केले.
मी कार्यकारी संपादक साहेब कडे गेलो. ते कामात होते.
त्यांनी मला पाहिले आर्टिस्ट शिंदे जावा काम करा....
साहेब पूर्ण केले ...! चला बघू या ते कला विभागात आले
त्यांनी पाहिले ना सुंदर...!!! आजपासून तुम्ही सामना मध्ये
आर्टिस्ट विभागात तुमचे स्वागत आहे.
Comments
Post a Comment