लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत येथे 💠 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचै मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी. ज्येष्ठ शिक्षक श्री.चौगुले एस.डी., श्री.कांबळे एन.डी. व  सुत्रसंचलन श्री.अमोल जोशी यांनी केले.शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी  साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर विविध प्रसंगांचे सांगितले. 
        या कार्यक्रमासाठी फोटो व व्हिडिओ शूटिंग कलाशिक्षक श्री. सुभाष शिंदे यांनी केले.
     शेवटी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,विद्यार्थिनींनी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
🔵🔵🔵🔵🔵💠💠💠💠💠💠🔵🔵🔵🔵🔵🔵
                 🔵लोकशाहीर अण्णाभाऊ साठे🔵
जन्म नाव: तुकाराम भाऊराव साठे 
 टोपण नाव:अण्णा भाऊ साठे 
 जन्म:दि.१ आॅगस्ट १९२०
वाटेगाव तालुका -वाळवा जिल्हा -सांगली
 मृत्यू:दि.१८ जुलै १९६९
 शिक्षण: अशिक्षित
 कार्यक्षेत्र:लेखक, साहित्यिक
 भाषा:मराठी
 साहित्य प्रकार: शाहिर,कथा, कादंबरीकार
 चळवळ:संयुक्त महाराष्ट्र चळवळ
 प्रसिद्ध साहित्यकृती: फकिरा
 प्रभाव: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स
 वडील:भाऊराव साठे 
 आई: वालुबाई साठे 
 पत्नी:कोंडाबाई साठे
              जयवंता साठे
 अपत्ये: मधुकर,शांता आणि शकुंतला
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
💠 अण्णाभाऊंनी लिहिलेले प्रवासवर्णन:
१)माझा रशियाचा प्रवास
 💠 अण्णाभाऊंनी लिहिलेल्या प्रसिद्ध कविता 
१) माझी मैना राहिली गावावरी
२) मुंबईमध्ये उंचावर
💠 कादंबऱ्या-३५
💠 कथासंग्रह - १९
💠 लोकनाट्य -१४
💠 पोवाडे -१९
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.साठे समाजामध्ये जन्मलेले होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.
    अण्णाभाऊंचे शिक्षण हे केवळ दीड दिवसाचे त्यानंतर ते शाळेत कधी गेलेच नाहीत. सवर्णाव्दारे  होणार्‍या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडली.                राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.महाराष्ट्र चळवळीत देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.ही चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले.पश्र्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
        त्यांच्या कथा,कादंबरीकार चित्रपट देखील करण्यात आले. फकिरा ही त्यांची गाजलेली कादंबरी ज्यात त्यांनी मांग समाजाचे जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
        या कादंबरीत मुख्य नायक फकिरा हा मांग समाजातील व्यक्ती असतो जो दुष्काळात ब्रिटिश राजकर्त्यांना लुटतो आणि तीच सुटलेली संपत्ती चोरलेले अन्न गरीबांना वाटुन देतो.
  त्यांच्या या कादंबरीस राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून गौरवण्यात तसेच सन्मानित करण्यात आले आहे.
   माझं रशिया प्रवास हे प्रवास वर्णन देखील अण्णांनी लिहिलेले आहे.
  अण्णाभाऊंनी त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
    त्यांनी त्यांच्या रचलेल्या सर्व लावणी पोवाड्या मार्फत कष्टकरी जनतेच्या जीवनात सुधारणा घडवून त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला .म्हणून जगात त्यांनी लोकशाहीर ही पदवी दिली.
    स्वातंत्र्याची आधी तसेच स्वातंत्र्यानंतर देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी अनेक महत्त्वाच्या राजकीय प्रश्नाचे बाबतीत महाराष्ट्रामध्ये जनजागृती केली ‌.
  अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा या लोकलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला.
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वैजयंती ही कादंबरी ज्या स्त्रिया तमाशामध्ये पहिल्यांदा काम करीत आहेत त्यांचे लोकं कडून कशी शोषण करण्यात येत येथे हे चित्रीत करते.
     लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी माकडाची माळ या कादंबरीतून भटक्या विरुद्ध जातीचे चित्रण  केले आहे ‌.
    अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव वालुबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई आणि तिच्या निधनानंतर त्यांनी जयवंता हिचेशी विवाह केला.अपत्ये पुत्र मधुकर कन्या शांता आणि शकुंतला होती.
      या महान समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
जत हायस्कुल अॅन्ड ज्यु.कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत .
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
कला शाखेच्या वतीने "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे" यांची जयंती आणि "लोकमान्य टिळक" यांची पुण्यतिथी मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी   विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक - मा. श्री. होवाळे सर.यांनी थोर महापुरुषांचे  विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे- कु.अक्षता संती तसेच कार्यक्रमाचे,
अध्यक्ष - कु.अनुराधा जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. पर्यवेक्षक - श्री. माळी सर. कला शाखेचे प्रमुख - श्री. गुरव सर आणि  सर्व शिक्षक , शिक्षेकेतर कर्मचारी वर्ग, विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि विध्यार्थिनीचा या कार्यक्रमात मोठया उत्साहाने सहभागी होता.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵💠💠💠💠💠💠💠💠💠💠

Comments