पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी जन्मशताब्दी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
(१५जुलै २९२२-२२ मार्च २०१२) महाराष्ट्रातील एक थोर सदस्यांनी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी म्हणून परिचित त्यांचा जन्म रामचंद्र व लक्ष्मीबाई दाम्पत्याच्या पोटी एका गरीब शेतकरी कुटुंबात सांगली जिल्ह्यातील वाळवा या गावी झाला .त्यांचे शालेय शिक्षण वाळवा व आष्टा या ठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांचा विवाह दि. १३फेब्रुवारी १९४९ रोजी कुसुमताई यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने झाला सन- १९३४ सालापासून त्यांना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय चळवळीचे प्रभावी नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभला पुढे समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्हाॅलंटरी शाळा चळवळ व विद्यार्थी चळवळी त्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी दशेत चले जाव चळवळीच्या मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात ते हजर राहिले चले जाव आंदोलनात काळात सातारा जिल्ह्यातील तासगाव वडूज इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा ते सहभागी झाले होते क्रांतीकाळात सेनेवली येथील त्यांच्या युतीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन ऑगस्ट १९४३ रोजी साताऱ्याचे प्रति सरकार सर्वप्रथम प्रणुंबे ( तालुका-शिराळा) ती स्थापन झाले.
यामध्ये नागनाथ अण्णा व कुंडल चे जी डी बापू लाड हे तरुण अग्रस्थानी राहिले नागनाथ अण्णांनी सशस्त्र लढा उभारण्यासाठी यशस्वी खटाटोप करून गोव्यावरून हत्यारे आणली होती .धुळे येथील सरकारी खजिना लुटणे पोलीस चौकीतून बंदुका पळवणे अशा धाडसी कारवाया त्यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने इंग्रज अधिकारी हैराण झाले होते शेवटी वाळवा येथे त्यांना अटक झाली व सातारा कारागरात लवंगी केली 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा तुरुंग फोडून नागनाथ अण्णा फरार झाले नागनाथ अण्णांना जिवंत अथवा मृत पकडून घेण्यासाठी सरकारने एक हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. क्रांतीकारक चळवळी मोडून काढण्यात प्रसिद्ध असलेला इंग्रज अधिकारी मयूर गिल्बर्ट याची नेमणूक सातारा भागातील क्रांतिकारकाच्या चळवळी मोडून काढण्यासाठी करण्यात आली होती 26 जानेवारी 1945 रोजी ऐतवडे येथील एका कार्यक्रमात नागनाथ अण्णा येणार असल्याची बातमी लागतात गिल्बर्टने तेथे छापा टाकला परंतु त्याला चकवा देण्यात नागनाथ अण्णा यशस्वी झाले. इंग्रज सत्ता आणि एक उद्देशीय गुंड समाजद्रोही आणि इंग्रजाचे खबरे त्यांना वाटणीवर आणण्यासाठी आणि विधायक सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना एक फौजी संघटन त्याकाळी आवश्यक वाटत होते त्यासाठी नागनाथ अण्णा हे सुद्धा दिल्लीला गेले व तेथील काँग्रेस कार्यालय त्यांनी श्रीमती मणीबेन पटेल यांची भेट घेतली व फौजी संघटना उभी करण्यासाठी एका प्रशिक्षकाची मागणी केली परंतु सहस्त्र लढा हे गांधी बसत असल्याने श्रीमती पटेल त्यांनी त्याला नकार दिला. त्यावेळी दोन शिफ्ट करून फौजी गणवेशात त्याच कार्यालयात आले आणि क्रांतिकारक कामे करण्यास आमची देशात कुठे नेमणूक करा अशी मागणी करत होते हे दोन करून पूर्वी आझाद हिंद फौजेच्या बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मदेशात पाठवलेल्या शिंख रेजिमेंटमध्ये होते. परंतु ती रेजिमेंट आझाद हिंद फौजेस मिळाली होती त्यासाठी नानक सिंह व मानसिंग हे दोघे फौजी होते त्यांना आपल्या संघटनेत सामील करून घेऊन शिराळा तालुक्यातील थापडे येथील जंगलात क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले सोमवडे येथील फौजी प्रशिक्षण छावणीवर इंग्रज पोलिसांनी 25 फेब्रुवारी 1946 रोजी हल्ला केला त्यामध्ये मिळण्यात अन्नाचे दोन सहकारी किसन अहिर व नानक सिंह यांना हुतात्मे प्राप्त झाले स्वातंत्र्य उत्तरकाळात वाळवा गावात दरवर्षी 25 फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिन साजरी करण्याची प्रथा ंनी सुरू केली ती अद्याप सुरू आहे स्वतंत्र दृष्टी पडतात येत असताना त्यांनी काही रचनात्मक विधायकामात स्वतःला उतरून घेतले शिक्षण प्रसारासाठी वाळवा येथील शाळेच्या शिक्षण प्रसारणासाठी वाळवा येथील शाळेच्या इमारतीचे काम सुरू केले सन-१८४६ हैदराबाद मुक्ती आंदोलनातील नेते शंकराव चव्हाण यांची भेट झाल्यावर क्रांतिकारकडे असलेली क्षेत्र त्यांनी सुपूर्द केली सण १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तथापि प्रति सरकारच्या क्रांतीकारकावर असलेले अटकेचे आदेश रद्द झाले नव्हते नंतर मुंबई सरकारने ही अटकेचे आदेश रद्द केले व त्यानंतर नागनाथ अण्णा वाळवा येथे आले
नागनाथ अण्णा स्वातंत्र्य उत्तर काढा तेही कार्यरत राहिले त्यांनी शिक्षण प्रचाराची किसान शिक्षण संस्था नोंदणी केली सण १९५३ वाळवा येथे हुतात्मा किसन अहिर व सोनवडे येथील हुतात्मा नानक सिंह यांच्या नावाने माध्यमिक शाळा सुरू केल्या त्याचप्रमाणे हुतात्मा नानक सिंह नावाने आणि नंतर १९६५ साली सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वस्तीग्रह स्थापन करून गरीब मुलां मुलींच्या राहण्याची व जेवणाची सोय मोफत केली. त्यांनी वाळवा विधानसभेच्या निवडणुका अनुक्रमे १९५२,१९५७ व १९८५साली लढवल्या त्यापैकी 1१९५७ व १९८५ साली ते विजयी झाले १९८१ साली हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याची नोंद करून कारखाना सुरू केला .१९८४साली चळवळीसाठी आर्थिक स्तोत्र निर्माण झाल्यावर त्यांनी वठार जिल्हा कोल्हापूर येथे शेतमजूर कष्टकरी शेतकरी परिषद घेतली 1993 स*** वारणा धरणग्रस्त व कोयना धरणग्रस्त यांच्या चळवळी उभा करून रंगस्थलच्या मुंबईत मोर्चा काढून सरकारचे या समस्ये कडे लक्ष वेधले 1999 संस्कृत चळवळीत दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलने तिसरे व चौथी अनुक्रमे १९८९ व १९९६ साली आयोजित केली. दुष्काळ प्रणव भागातील जनतेच्या न्याय हक्कासाठी १९९३ सालापासून ते शेवटपर्यंत त्यांनी दुष्काळ भागातील तेरा तालुक्यात पाण्याची चळवळ उभा केली आणि लढा दिला. त्यासाठी त्यांनी माण देशातील आटपाडी येथे पाणी पडशील चे आयोजन केले साखर कामगार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या परिस्थितीत घेऊन त्यांनी त्या घटकांना संघटित केले २०००साली सरकारने महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर आयकर लागला होता. त्या विरोधात त्यांनी न्याय मागण्यासाठी लढा दिला .नागनाथ अण्णांनी हुतात्मा किसन अहिर यांच्या पूर्णाकृती पुतळा साखर कारखान्याच्या परिसरात उभा करून महाराष्ट्र राज्याचे तात्काली उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते अनावरण केले फेब्रुवारी २००८साली तर क्रांतीची नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची शाळेच्या मैदानावर तत्काल आणि राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण केले. सन- फेब्रुवारी २००९ नागनाथ अण्णा यांना अनेक मानसन्मान मिळाले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर त्यांच्याकडून सन्माननीय डिलीट २००७ महाराष्ट्र फाउंडेशन यांच्याकडून जीवन गौरव पुरस्कार हुतात्मा गौरव पुरस्कार किसनवीर सामाजिक पुरस्कार लोकनेते पुरस्कार इत्यादी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले सण २००९ संदर्भ :💠अहिर जयवंत क्रांतिवीर नागनाथ अण्णा भाग एक व दोन गौरव समिती वाळवा२००९ 💠 पाटणकर भारत महाराष्ट्राचे शिल्पकार क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी महाराष्ट्र राज्य , साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,२०१८.
Comments
Post a Comment