भावपूर्ण श्रद्धांजली!
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले.ही बातमी कळाली तेव्हा धक्काच बसला.
पारसे सरांनी प्रतिकूल परिस्थिती वर मात करत शिक्षण घेतले.त्यांच्याकडे जबरदस्त इच्छा शक्ती होती.परिस्थिती वर मात करत ते आनंदाने समोर गेले. प्रयत्न , धडपड, जिद्द, मेहनत करताना स्वतःला झोकून दिले.सर काही काळ आमच्या शाळेत होते. सरांचे अक्षरलेखन
सुंदर होते.ते विविध माध्यमातून अक्षरलेखन करीत असत.पगार नसल्यामुळे सर गावात पेंटर कडे बसून तक्ते,
शैक्षणिक साधने तयार करीत असे . त्यातून सर्व खर्च करीत असे. सरांना गायनाची आवड होती.त्यांनी फेसबुक वर विविध संगीत माध्यमातून गाणी मराठी, हिंदी तून गायन करून प्रसारीत केली. गीते मनास आनंद देऊन जातात.
मा.पारसे सर एक मनस्वी कलावंत होते.शास्त्र शाखेची
पदवी असुनही कलेचा छंद नेहमीच जपला.अक्षरलेखन ,कला,गायन यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले.
ज्यावेळी माध्यमिक आश्रमशाळा,जत मध्ये सेवेत रूजू
झाले तेव्हा त्यांना सर्व काही आनंदात होते.शैक्षणिक कामकाज चांगले होते.सर्वाशी प्रेमाने वागणं, हसतमुख
बोलणं! आणि कलेची साधना! करणारा माझा मित्र....
आज आपल्यातून निघून गेला. पारसे सर! एक अष्टपैलू
शिक्षकांच्या स्मृतींना उजाळा देताना मन व्याकूळ होते.
सदैव नवनवीन प्रयोगशिल शिक्षक पारसे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!! ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.
हीच प्रार्थना!🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏😭😭😭
💠शोकाकुल:श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.ता.जत जि.सांगली.
Comments
Post a Comment