जत हायस्कूल, जत मध्ये केंद्र -जत कन्या ची शिक्षण परिषद संपन्न....!
:
शिक्षण परिषद क्रमांक-०१
केंद्र :जत कन्या
स्थळ:जत हायस्कूल,जत.
🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥
जत हायस्कूल,जत.मध्ये केंद्र :जत कन्या
ची पहिली शिक्षण परिषद संपन्न झाली.
केंद्र प्रमुख -श्री.संभाजी कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक विविध उपक्रमांचे सादरीकरण विषय तज्ज्ञ शिक्षक,शिक्षिकांनी सुयोग्य नियोजना
नुसार केले. केंद्र:जत कन्या तील प्राथमिक, माध्यमिक अध्यापक- अध्यापिका, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक
यांनी सहभाग घेतला. गटशिक्षणाधिकारी पं.स.जतचे मा.श्री.
साळुंखे साहेब यांनी भेट दिली आणि शासकीय विविध उपक्रमांची माहिती सांगितली.सर्वांनी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावे यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी विशेष प्रयत्न करावे.
यावेळी जत हायस्कूल, जतचे मुख्याध्यापक,श्री.होवाळे ए. बी. यांच्या हस्ते मा.श्री.सांळुंखे साहेबांचा सत्कार करण्यात आला.केंद्र प्रमुख श्री.संभाजी कोडग यांचा पर्यवेक्षक -श्री.धायगोंडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहकार्य करणारे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी.यांचा सत्कार मा.गटशिक्षणाधिकारी -श्री.साळुंखे साहेबांनी केला.
विषय तज्ज्ञ : माने मॅडम,सौ.नंदा महाजन, श्री.शिवशरण,सुलोचना साळुंखे, बिराजदार पी.एन., जयश्री देवमाने,
सुधाकर साळे आयुब नाईक, रामचंद्र पुजारी,सागर शेंडगे,मोरताडे सर, यांच्या सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची व्यवस्था जत हायस्कूल,जत चे मुख्याध्यापक श्री. होवाळे ए.बी., पर्यवेक्षक -श्री.धायगोंडे ए.टी. व कलाशिक्षक -श्री.सुभाष शिंदे
व सेवक कर्मचारी वर्ग यांनी छान सहकार्य केले.
बहोत बढिया सर
ReplyDelete