जागतिक योग दिनानिमित्त जत हायस्कूल जत मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!!

जागतिक योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!
 जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत मध्ये जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सौ.अनुराधा संकपाळ ,योगशिक्षिका यांनी योग दिनाचे महत्त्व व प्रात्यक्षिक द्वारे  मार्गदर्शन केले.  प्रशालेचे मुख्याध्यापक  ए.बी.होवाळे, पर्यवेक्षक-श्री.धायगोंडे ए.टी. आणि प्रशालेतील सर्व अध्यापक,अध्यापिका , शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी प्राणायाम,योगासने, इ.चे प्रात्यक्षिक केले.
प्रास्ताविक श्री.अमोल जोशी यांनी केले.श्री.मुजावर सर,श्री.सुभाष शिंदे यांनी सहकार्य केले.
सर्वांना जागतिक योगा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*💐💐💐💐💐💐🎤

Comments