श्री.संजीव आनंदराव नलवडे,यांना स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी विटा स्मृती चषक पुरस्कार प्रदान!
स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी विटा स्मृती चषक पुरस्कार श्री संजीव नलवडे यांना प्रदान!
सांगली : दिनांक- १०जून रोजी जिल्हा माध्यमिक
शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था (वारणाली )सांगली च्या सभागृहात सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली आयोजित राज्यस्तरीय स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी प्रतिष्ठेचा, सन्मानाचा पुरस्कार व सेवानिवृत्त कलाशिक्षक, पर्यवेक्षक मराठा मंदिराचे श्री .संजीव आनंदराव नलवडे यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला .या कार्यक्रमाची सुरुवात संघाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र ठोके यांनी स्वागत प्रास्ताविक करताना पुरस्काराची संकल्पना व्यक्त होताना पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक कला कौशल्य ,विद्यार्थी विविध स्पर्धा यश, शासकीय रेखाकला परीक्षेतील योगदान, सामाजिक बांधिलकी कला शिक्षक यांनी कला योगदानाबद्दल राष्ट्रीय ,राज्य ,जिल्हा तालुका स्तरावर पुरस्कार यांचा सहभाग. या समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. श्री मोहन पतंगे (आर्टिस्ट, पावडर शेडिंग) यांचा सत्कार अध्यक्ष श्री. श्रीकांत माळी यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी उपाध्यक्ष श्री राजेंद्र ठोके श्री संजय रोकडे ,श्री सुभाष शिंदे कार्यवाह ,श्री उत्तम पाटील सहकार्यवाह उपस्थित होते. सन्मानीय कार्यवाह श्री सुभाष शिंदे यांनी आपल्या मित्रांविशेषी श्री .संजीव नलावडे सरांच्या कला जीवनातील विविध प्रसंग सांगितले . यामध्ये जत सारख्या भागात कला चळवळ, विद्यार्थी वर्गासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना कला सेवेत असताना चित्रकला ,पेंटिंग ,फोटोग्राफी या कला आविष्कार अहोरात्र रंगलेला हा एक कलेसाठी निर्माण केलेला कलावंत! आहे. शिक्षक आणि याशिवाय एक माणूस म्हणून स्वच्छ व्यक्तिमत्व खरी ओळख आहे .महिला प्रतिनिधी व सूत्रसंचालक सौ.वंदना हुलबत्ते मॅडम यांनी मा. श्री. संजीव नलवडे सर यांचे योगदान कौतुकास्पद आहे. मराठा मंदिर मुंबई संचालित श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज जत .१२५ वर्षे पूर्ण केलेल्या शाळेत कार्यरत असून ते अत्यंत विद्यार्थीप्रिय ,शिस्तप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत .श्री .नलवडे सरांना मिळवलेल्या विविध राष्ट्रीय, जिल्हा, तालुका पुरस्काराचे वाचन करण्यात आले. कला अध्यापनात त्यांनी नवनवीन प्रयोग करून कला विषय अध्यावत करण्याचा छंद आहे. चित्रकला स्पर्धा, शासकीय रेखाकला परीक्षा ,रांगोळी स्पर्धा व विविध कला प्रदर्शन साठी त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचे!
त्यानंतर मराठा मंदिराचे श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे कलाशिक्षक, पर्यवेक्षक, प्र.मुख्याध्यापक, श्री. संजीव आनंदराव नलवडे हे दिनांक -३१ मार्च २०२२रोजी सेवानिवृत्त बद्दल व राज्यस्तरीय स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी पुरस्कार प्रमुख पाहुणे मा. आर्टिस्ट श्री मोहन पतंगे ,अध्यक्ष- श्री. श्रीकांत माळी, उपाध्यक्ष -राजेंद्र ठोके कार्यवाहक- श्री. संजय रोकडे, श्री .सुभाष शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्मृती चषक ,ग्रंथ ,रोख-१००१/- शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप. सौ ./श्री. संजीव नलवडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला . प्रमुख पाहुणे मा. मोहन पतंगे यांनी आपल्या मनोगतामध्ये कला जीवनातील विविध प्रसंग सांगितले . जीवनामध्ये सर्व काय आहे त्याचा आनंद सर्वानी घ्यावा .पुरस्कार प्राप्त कलाशिक्षकांनी आपल्या कलेची सेवा निरंतर करावी ! असे आवाहन केले. पुरस्कार कला शिक्षकांनी आपल्या मनोगतामध्ये सेवाकालात केलेल्या कार्याचा सन्मान हा मराठा मंदिर , प्रशाला प्रशालेतील विद्यार्थी ,गुरुवर्य आई- वडील यांना समर्पित केला. त्यांच्या वेळी भावनिक साद घालताना काही कवितेचा ओळी सादर केल्या .त्यामुळे सभागृह भावना विवश झाले.
ओंजळ तुझ्या प्रेमाची,
घेऊन भरारी घेतोय आकाशी.....
यशापेक्षाअपयशांना उराशी,
घेऊन भरारी घेतो स्वनाची....
एक दिवस मिळेल,
यश, किर्ती अन् शेवटी किनारा ही
तुझ्यास पायाशी!
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आभार न मानता धन्यवाद व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.श्रीकांत माळी सरांनी पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक व सेवानिवृत्त कलाशिक्षक, मुख्याध्यापक यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ.वंदना हुलबत्ते मॅडम यांनी केले.व शेवटी आभार श्री.रामचंद्र दिक्षित सरांनी केले.अशा प्रकारे हा समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी कलाशिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थित होते.जेष्ठ कलाशिक्षक श्री.आर.ए.पाटील,श्री.उत्तम पाटील,श्री.राजेंद्र दिक्षित,श्री.जयवंत पाटील,श्री.सुधीर पोतदार,श्री.जितेंद्र शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment