स्वर्गीय भगवानराव ठोके स्मृती चषक पुरस्कार: श्री.संजीव आनंदराव नलवडे कलाशिक्षक, पर्यवेक्षक श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,जत यांना प्रदान...!
*स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी विटा* *स्मृती चषक पुरस्कार श्री.संजीव* *नलवडे*
*यांना प्रदान !*
💫💐💫🌹💫💐💫🌹💫💐
सांगली:दि.१०जून रोजी सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था संस्था लिमिटेड सांगली च्या सभागगृहात सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली आयोजित स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी प्रतिष्ठेचा, सन्मानाचा पुरस्कार व सेवानिवृत्त कलाशिक्षक व मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात संघाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र ठोके यांनी स्वागत प्रस्ताविक व या पुरस्काराची संकल्पना व्यक्त केली.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. श्री मोहन पतंगे यांचा सत्कार अध्यक्ष श्री. श्रीकांत माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष श्री राजेंद्र ठोके श्री संजय रोकडे ,श्री सुभाष शिंदे,श्री.उत्तम पाटील कार्यवाह उपस्थित होते.
श्री सुभाष शिंदे यांनी मनोगत मध्ये पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक व मित्र श्री.संजीव नलवडे सरांचा कला जीवनातील विविध प्रसंग सांगितले. त्यानंतर महिला प्रतिनिधी व सूत्रसंचालक सौ. वंदना हुलबते यांनी श्री नलवडे सरांना मिळालेल्या विविध पुरस्काराचे वाचन करण्यात आले. त्यानंतर श्री संजीव आनंदराव नलवडे श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल जुनियर कॉलेज दिनांक ३१ मार्च रोजी सेवानिवृत्ती बद्दल व स्वर्गीय भगवान गुरुजी विटा स्मृती चषक पुरस्कार मा .श्री मोहन पतंगे ,अध्यक्ष श्री श्रीकांत माळी ,उपाध्यक्ष श्री राजेंद्र ठोके व श्री संजय रोकडे श्री सुभाष शिंदे ,कार्यवाह, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला स्मृती चषक ,ग्रंथ रोख एक हजार एक ,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप,सौ.श्री.नलवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री विश्वनाथ पाटील गडगे गर्ल्स स्कूल सांगली येथून दिनांक ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल झाल्याबद्दल सौ./श्री.पाटील सरांचा सत्कार प्रमुख पाहुणे श्री मोहन पतंगे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री प्रकाश खारगे भोर हायस्कूल येथून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्ती बद्दल
प्रमुख पाहुणे श्री मोहन पतंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जतचे जेष्ठ कलाशिक्षक श्री आर .ए.पाटील यांचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय काव्य संमेलनात कविता सादरीकरण केल्याबद्दल सौ.वंदना हुलबत्ते मॅडम यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.मोहन दिंडे (कार्याध्यक्ष) यांच्या सत्कार करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त: श्री.संजीव आनंदराव नलवडे व सेवानिवृत्त श्री.विश्वनाथ पाटील,श्री.प्रकाश खारगे यांनी मनोगत
व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे श्री मोहन पतंगे यांनी मनोगतामध्ये कला जीवनातील विविध प्रसंग सांगितले कलेची साधना सर्वानी करावी . कला जीवनामध्ये सर्व काही तेथे त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.श्रीकांत माळी सरांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक सेवानिवृत्त कलाशिक्षक ,मुख्याध्यापक यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . वंदना हुलबत्ते मॅडम यांनी केले व शेवटी आभार श्री रामचंद्र दीक्षित यांनी केले अशा तऱ्हेने हा समारंभ संपन्न झाला . कार्यक्रमासाठी कलाशिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment