छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची भव्य दिव्य मिरवणुक सोहळा !!!!!! जत नगरीत सोमवारी,दि.०६ जून २०२२रोजी🙏🙏💐💐💐
राजा थोर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जत येथे बसवणेसाठी आज जिल्हाधिकारी माननीय डॉ. अभिजित चौधरी साहेब यांनी परवानगीचे पत्र दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण ,जलसंपदा मंत्री यांचे ओ. एस.डी.अमोल डफळे ,बाजीअण्णा केंगार , शिवप्रेमी प्रणव पाटील, आनंद पाटील, बाळासाहेब मिरजकर, देवराज माळी उपस्थित होते.जत तालुक्यातील शिवप्रेमींची इच्छा होती की 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराजांचा पुतळा विराजमान व्हावा म्हणून 11 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जत येथे आणण्यात आला प्रशासनाची परवानगी नसल्याने पुतळा चबुतऱ्यावरती बसविणेस नकार दिला .त्यामुळे महाराजांचा पुतळा संग्राम पेट्रोल पंपावरती ठेवण्यात आला .जत शहरामध्ये 8 दिवस जवळपास 1200 पोलिस बंदोबस्तासाठी होते.खा.संजयकाका पाटील व समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांच्या पुढाकाराने पालकमंत्री ना.जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये आवश्यक त्या कार्यालयाची परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा प्रशासन सर्व ते सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी संग्राम पेट्रोल पंप वरती शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी झाली .त्यावेळी सर्व शिवप्रेमी समोर माजी आमदार तथा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप साहेब यांनी सर्व परवानग्या आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी आज पूर्ण केली याचा मला अभिमान आहे .
या परवानगी साठी पहिल्यांदा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे अत्यावश्यक होते त्यासाठी जिल्हा ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष सतीश भोसले यांचेमार्फत परिपूर्ण प्रस्ताव सादर केला परंतु धर्मादाय आयुक्त यांनी अश्या प्रकारे प्रस्ताव सादर न करता छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान जत या नावाने प्रस्ताव सादर करा अश्या सूचना केल्या .यासाठी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले सातारा यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते यासाठी मी स्वतः व शिवप्रेमी यांच्याबरोबर सातारा येथे जाऊन नाहरकत प्रमाणपत्र मिळवले .त्यानंतर कलासंचनालाय व वास्तूशास्त्र यांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळणेसाठी आवश्यक ते कागदपत्रे देऊन परवानगी मिळाली .विशेष करून खा.संजयकाका पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग यांचेकडे पाठपुरावा केल्याने राष्ट्रीय महामार्गचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाले.जत पोलिस स्टेशन चे रामेश्वर पाटील साहेब, तत्कालीन पोलिस निरीक्षक डूबुल साहेब व पोलिस उपअधीक्षक नवले साहेब यांनी एका रात्रीमध्ये आपला आव्हाल तयार करून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला .15 फेब्रुवारी पासून 3 महिन्या मध्ये सगळ्या कार्यालयाकडे पाठपुरावा करून नाहरकत प्रमाणपत्रे मिळवली.यासाठी सातत्याने समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप साहेब, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे साहेब व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी साहेब पाठपुरावा करत होते .
पालकमंत्री ना.जयंत पाटील साहेब, खा.संजयकाका पाटील ,समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप साहेब व शिवप्रेमी यांच्या पाठपुराव्याने मी हे महान कार्य पूर्ण करू शकलो याचा मला खूप आनंद आहे .मी समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप साहेब , खा.संजयकाका पाटील , जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी साहेब , त्यांचे सर्व अधिकारी ,पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम साहेब त्यांचे सर्व अधिकारी , राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता सागावकर त्यांचे सर्व अधिकारी ,कला संचनालयाचे नागणे साहेब व त्यांचे अधिकारी , वास्तू शास्त्रचे अधिकारी माठोडकर मॅडम व देशपांडे मॅडम , इंजिनियर कपिल शिंदे ,नगरपरिषदेचे मुख्यधिकारी वाघमोडे साहेब व नगराध्यक्षा , उपनगराध्यक्ष यांचे मनःपूर्वक आभार मानतो .
आपण सर्व शिवप्रेमींनी 6 जून 2022 रोजी पुतळा प्रतिष्ठापना करणेसाठी उपस्थित रहावे ही विनंती .
आपला नम्र
प्रकाश वि.जमदाडे
*उपाध्यक्ष*
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान जत.
Comments
Post a Comment