कलेचा उपासक! दैनिक लोकमत वृत्त: सोमवार, दि०२जून २०१०
दैनिक लोकमत : सोमवार,दि. ०२ / जून /२०१०
कला ही मागून मिळत नसते.ती विकतही घेता येत नाही कला शिकण्यासाठी कलेबद्दल मनात भक्तीअसावी लागते.
कला ही मागून मिळत नसते.ती विकतही घेता येत नाही कला शिकण्यासाठी कलेबद्दल मनात भक्तीअसावी लागते.
कला !देवीचा साक्षात्कार होण्यासाठी कलाकाराकडे सच्चे जिगर असावे लागते.
शालेय जीवनातच चित्रकलेची मैत्री करून
कलाविश्वात आपला वेगळाच ठसा उमविणारा एक अवलिया जत मध्ये वावरत आहे. कलेला परमेश्वर मानून तिची पूजा करणाऱ्या त्या सच्चा कलाउपासक्राचे नाव आहे.
सुभाष सदाशिव शिंदे
शिंदे हे सध्या जत मधील दि फ्रेंड्स असोसिएशन, जतच्या जत हायस्कूल 'कलाशिक्षक ' म्हणून कार्यरत आहेत.जिद्द आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कला क्षेत्रात गरुड भरारी घेतलेल्या आपल्या यशस्वी विद्यार्थ्याची माहिती शिंदे यांचे मार्गदर्शक डॉ.श्रीपाद जोशी अभिमानाने सांगत होते.ते पुढे म्हणाले सुभाष चे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण बुधगावमधील बुधगाव हायस्कूल बुधगाव मध्ये झाले. सुभाषला लहानपणापासून चित्रकलेबद्दल विशेष आकर्षण होते.त्याचे वडील हार्मोनियम वादक होते.त्यामुळे बालवयापासून सुभाष कलेच्या वातावरणात वाढत होता.सुभाष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.मात्र चित्रकलेची आवड सुभाषला गप्प बसू देत नव्हती. सुभाषने चित्रकलेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. सांगलीतील शांतिनिकेतन मधील कलाविश्व महाविद्यालय सन १९८७ मध्ये सुभाष ए.टी.डी.हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाला.त्यानंतर सन -१९८९बी.फोटो व २००१ मध्ये ए.एम.पदवी संपादन केली. सन -१९९१ मध्ये जत येथील जत हायस्कूलमध्ये पूर्णवेळ कलाशिक्षक म्हणून रुजू झाला.सुभाषची जन्मभूमी 'बुधगाव ' पण 'कर्मभूमी 'जत' झाली.
शिक्षक म्हणून एकदा नोकरी मिळाली की बऱ्याच वेळा कलाशिक्षकांचे खडू,फळा, पेन्सिल, कॅनव्हास व रंगाशी असलैले नाते तुटूत जाते.परंतु कलेचा सच्चा उपासक असलेल्या सुभाष शिंदेंच्या बाबतीत काही वेगळेच घडले.नोकरी मिळाल्यानंतरही कलेतील वेगळेपण जपत शिंदे यांनी कलेचा जागर अखंडित ठेवला. विद्यार्थ्यांना चित्रकलेतील सोप्या-सोप्या टिप्स सांगून ते विद्यार्थीप्रिय बनले.हाताने चित्र रेखाटन करणे हे काही नवे नाही.पण तोंडाने चित्रे काढण्यात शिंदेंचा हातखंडा आहे.तोंडाने, दोन्ही हाताने , उजव्या पायाने चित्रे काढून शिंदेंनी आपले वेगळेपण जपले आहे.कलेप्रमाणे शिंदेंना कथाकथनाची आवड आहे.साने गुरुजी कथामालेत सांगली जिल्हा संघटक म्हणून त्यांनी यशस्वी काम पाहिले आहे.साने गुरुजींच्या जन्मशताब्दी निमित्त शिंदेंनी राज्यभर कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत.
कलाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल यांना १९९० मध्ये 'रचनाचित्र' राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य कला व्यापक संघातर्फे शिंदेना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.सुभाष शिंदे यांना वडील सदाशिव,आई शांताबाई, प्राचार्य -जयसिंग पैलवान, सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत माळी ,दि फ्रेंडस् असोसिएशन,जत चे अध्यक्ष गुरूमूर्ती ऐनापुरे,सचिव डॉ.मदन बोर्गीकर,जत हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.ए.मेत्री,म.ल.देसाई यांचे प्रोत्साहन लाभत आहे .
🟦 आदित्यराज घोरपडे
थोडक्यात परिचय :
शिक्षकांचे नाव: डॉ.श्रीपाद जोशी
विद्यार्थ्यांचे नाव: सुभाष शिंदे (कलाशिक्षक:जत हायस्कूल,जत)
⭐ शिक्षण:ए.टी.डी.एएम.,बी.ए.,बी. फोटो (मुंबई)🔵 जीवनमूल्याधिष्ठित शिक्षण चर्चा समारंभ मध्ये थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.श्री.वि.वा.शिरडवाडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ.वाय.के शिंदे, शिक्षणतज्ज्ञ व अभ्यासक-श्री.सदानंद कदम, प्रसिद्ध व्याख्याकार श्री.अरूण डबीर यांच्या समावेश
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Comments
Post a Comment