जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली!🙏🙏🙏🙏💐🙏🙏🙏🙏

🔵 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
🔵 श्री.होवाळे ए.बी. मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग सांगितले.
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स ,जत येथे भारतरत्न ,बोधिसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाची सुरुवात जय मल्हार फौंडेशन , जत चे अध्यक्ष श्री हेमंत चौगुले यांच्या शुभाहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमा साठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. होवाळे ए.बी. सर , पर्यवेक्षक श्री. धायगोंडे ए. टी.सर , जेष्ठ अध्यापक श्री .गुरव एन.आर .सर , श्री. नाईक सर. व सर्व अध्यापक. अध्यापिका , शिक्षकेत्तर सेवक श्री.स्वामी एम .ए सर, ग्रंथ पाल श्री.दुगाणे आर. ए. सर हे उपस्थित होते. सुत्र संचालन श्री.कुलकर्णी व्ही.पी सर यांनी केले. या कार्यक्रमाला फोटो ग्राफी व फलक लेखन रूपी साज चढवण्याचे काम श्री. कलाध्यापक श्री. सुभाष शिंदे सर यांनी केले .मुलांनी मनोगत व्यक्त केले तर श्री. होवाळे सर मार्गदर्शन केले. या जयंती निमित्त मल्हार फौंडेशनच्या वतीने गरिब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही चे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करून करण्यात आली.

Comments