श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर यांचा ५४वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला!!
*जीवेत शरदः शतम्......*
सांगली जिल्हा कलाध्यापक संघ महामंडळाचे आघाडीचे तडफदार उत्साही सच्चे कार्यकर्ते... विद्यमान कार्यवाह, स्वार्थापलिकडे जाऊन निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे कलाशिक्षक म्हणून कला विषयात सतत सजग असणारं हळवं व्यक्तिमत्व, प.पू.सानेगुरुजी विचारांची आणि कपाळी विठ्ठलाच्या अबीर- बुक्क्याचा टिळा लेऊन वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खां जेद्यावर डोलानं मिरवणारे,विश्वविक्रमी शिवराज्याभिषेक महारांगोळी उपक्रमात उत्साहपूर्ण सहभाग देणारे, नवागत कलाशिक्षकांना प्रेरणा देणारे,शालेय अध्यापन- कार्याबरोबरच कला, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय, संघटनात्मक पातळीवर सतत कार्यमग्न असणारे जेष्ठ कलाशिक्षक आदरणीय *मा. सुभाषजी शिंदे-(बुधगांव)* या आपल्या उमद्या कलाशिक्षकमित्रवर्यांना *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....*
*शुभेच्छुक.....*
*चित्रकला ग्रेड परीक्षा मूल्यमापन केंद्र-सांगली,*
*सांगली जिल्हा व वाळवा तालुका महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे.*
*विश्वविक्रमी शिवराज्याभिषेक सोहळा महारांगोळी समिती,सांगली*


सरांचा ५४ वाढदिवस !
जत:दि.१२मार्च २०२२जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांचा वाढदिवस एक वेगळा प्रकारे साजरा करण्यात आला.केक न कापता विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला.
प्रत्येक वर्षी दि.१२मार्च ते पुढील वर्षी दि.१२मार्च पर्यंत
विविध उपक्रम, सामाजिक, शैक्षणिक, शालेय
विद्यार्थी,विद्यार्थिनीं साठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच तालुका, जिल्हा, राष्ट्रीय स्तरावरील कला, चित्रकला,हस्तकला,नाट्य
रांगोळी, नाट्य, कथाकथन, वेशभूषा, कविता लेखन,गायन,
शालेय विविध उपक्रमांमध्ये स्वतः सहभागी होऊन काम , करायचे,गैली ३१वर्षे फलक लेखन करीत आहेत
शाळेतील सेवेत आल्या पासून आजपर्यंत तालुका, जिल्हा, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, विद्यार्थिनींना पारितोषिके प्राप्त
झाली आहेत.त्यांचा अभिमान आहे. माझे आठ माजी
विद्यार्थी, विद्यार्थिनीं कलाशिक्षक सेवेत कार्यरत आहेत.
यांचे अवलोकन प्रत्येक वाढदिवशी वर्षी करतो.आणि पुढील नवीन वर्षाच्या संकल्पना नियोजन करतो.
💠माझा मित्र-रचनाचित्रकार श्री.संजीव आनंदराव नलवडे, पर्यवेक्षक,श्री.एस.आर.व्ही.हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,जत.यांचा सकाळी फोन आला दोस्ता ! तुझा आज वाढदिवस आहे.तुला हार्दिक शुभेच्छा!, आम्हीं एका बुधगावाचे , कलाशिक्षक
आणि जत या गावात सेवेत ...हे आमचे भाग्य! यावर्षी मला वाईट
वाटलं,माझा मित्र श्री.संजीव नलवडे हे १५ दिवसांनी सेवानिवृत्त होत आहेत.आम्ही दोघांनी दोन्ही शाळेत चित्रकला विषयासाठी
विद्यार्थी, विद्यार्थिनींना उच्च कलाशिक्षक दिले.जत तालुका
मध्ये चित्रकला विषयांचे स्थान उच्च स्तरावर नेले आहे.सांगली
जिल्ह्यामध्ये जत तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना चित्रकला मध्ये मानाचे स्थान आहे.माझा दोस्त पुढील वर्षी
नसेल याचं खूप वाईट ......
सकाळी ७वाजत शाळेत गेलो.शाळेचा प्रवेशद्वाराजवळ
विद्यार्थी,विद्यार्थिनीं झालेली गर्दी सर....सर...... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! सर... हॅप्पी बर्थडे,...
आवाजाने मोठा गोंधळ पाहून सेवकाला वाटले काहीतरी
झाले आहे.तो माझ्याजवळ आला सर काय झाले.? मुले
ओरडली मामा सरांचा आज वाढदिवस आहे.तेंव्हा मामाने
मला शुभेच्छा दिल्या!!!!
Comments
Post a Comment