जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत मध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन: शिक्षक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.


जत हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जत येथे मराठी भाषा गौरव दिन व उत्साहात संपन्न!

 रविवार,दिनांक 27 फेब्रुवारी2022 रोजी, जत हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत येथे,जत तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी शिक्षक महासंघाच्या वतीने, मराठी राजभाषा गौरव दिन व जत तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविवर्य लवकुमार मुळे ( माजी अध्यक्ष साहित्य सेवा मंच शेगाव )व मा. श्री.दिलीप जाधव ( अध्यक्ष, सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी शिक्षक महासंघ )यांच्या हस्ते  कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने  झाली. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून जत तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष,प्रा. श्री व्ही.पी कुलकर्णी यांनी जत तालुक्यातील मराठी शिक्षकांनी एकत्र येऊन मराठी भाषा समृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. व कुसुमाग्रज यांच्या कविता सादर करून कुसुमाग्रज्यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी राजभाषा दिनाच्या नि विश्वविक्रममित्ताने जत तालुक्यातील सर्व मराठी शिक्षक एकत्रित आले आहेत,यासारखा दुसरा सुवर्णयोग नाही असे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा परिचय सांगली जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य,श्री. माणिक कोडग यांनी करून दिला. व मराठी शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन शिक्षकांशी सुसंवाद साधला. सर्व मराठी शिक्षकांच्या वतीने प्रा. श्री धायगुडे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. व मराठीचा प्रसार आणि प्रचार यासाठी  झटत राहू असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. कविवर्य श्री.लवकुमार मुळे यांनी आपल्या सुमधुर वाणीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व स्वलिखित मुक्तछंदतील कविता सादर करून आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली. मराठी भाषा समृद्धीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप जाधव यांनी शिक्षकांशी सुसंवाद साधून शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या  तसेच संघटनेच्या पुढील ध्येय धोरणाबाबत विचार  व्यक्त करून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या! या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी शिक्षक महासंघाचे खजिनदार मा. श्री.गवारी सर, शिक्षण सेवक सोसायटी लि. सांगलीचे  चेअरमन  मा श्री.संदीप पाटील , आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले कलाध्यापक श्री.सुभाष शिंदे, जत हायस्कूल जतचे चे पर्यवेक्षक,श्री ए.टी धायगोंडे, मराठीचे साहित्यिक, लेखक,श्री. ऐनापुरे सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. अरुण साळे.  पंचायत समिती जत येथील श्रीम.पाटील मॅडम, मराठी  साहित्याचे वाचक प्रा. श्री. एस. एस.बाबर, मराठी साहित्याचे  रसिक  श्री.सुरेश पत्की, जिल्हा परिषद आदर्श शाळा कुंभारी येथील मराठी विषयाची आवड असणाऱ्या सौ.स्मिता कुलकर्णी, राजे रामराव महाविद्यालय जत येथील, मराठी विषयाच्या  प्राध्यापिका सौ. दिपिका बाबर,    आर. बी.एन. न्यूज चॅनेल चे वार्ताहर प्रा.श्री कुलकर्णी सर, दैनिक समाज चे पत्रकार श्री. प्रमोद मेटकरी, मराठी विषयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.कुमार इंगळे यांनी केले, तर आभार जत तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी शिक्षक महासंघाचे सचिव, श्री.पी.व्ही वठारे यांनी मानले.

Comments