जत हायस्कूल,जत मध्ये चिंतन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन...!

🌷 जत हायस्कूल, जत 🙏*स्काऊट-गाईड विभागाने चिंतनदिन उत्साहाने साजरा करण्यात आला साजरा!


दि.२२फेब्रुवारी हा स्काऊट चळवळीचे प्रणेते लाॅड बेडन🌷 जत हायस्कूल, जत 🙏 स्काऊट-गाईड विभागाने चिंतनदिन उत्साहाने साजरा करण्यात आला साजरा!
दि.२२फेब्रुवारी हा स्काऊट चळवळीचे प्रणेते लाॅर्ड बेडन पाॅवेल त्यांच्या पत्नी लेडी बेडन पाॅवेल यांचा जन्मदिन आहे.
त्यांचा जन्मदिवस हा जगामध्ये चिंतनदिन 
म्हणून साजरा करण्यात येतो.
     जत हायस्कूल,जत स्काऊट-गाईड विभागाने चिंतनदिन साजरा करण्यात आला. 
      स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी नियोजन केल्याप्रमाणे प्रथम प्रार्थना गायन, त्यानंतर लाॅर्ड बेडन पाॅवेल व लेडी बेडन पावेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
      यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री‌. पी.एम कांबळे ,पर्यवेक्षक श्री. चौगुले एस.डी. स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन, शिक्षक वृंद उपस्थित होता. 
जगाचे पहिले स्काऊट:लाॅर्ड ब्रेंडन पाॅवेल
यांचे मनोगत...
मी एके काळी लहान मुलगा होतो.
मी माझ्या चार भावांबरोबर इंग्लंडच्या किनाऱ्याभोवती समुद्रातून नाविक स्काऊट म्हणून जो प्रवास केला, तो माझ्या बालपणीचा सर्वांत जास्त आनंदाचा काळ होय. आम्ही काही खरे नाविक स्काऊट नव्हतो. कारण त्त्या वेळी स्काऊट चळवळच मुळी जन्माला आलेली नव्हती. पण आमची स्वतःची एक होडी होती. तिच्यामधून सर्व प्रकारच्या हवामानात आणि सर्व ऋतूंत आम्ही जलप्रवास करीत होतो. या प्रवासात कधी हालअपेष्टा होत आणि कधी सुखसमाधानही मिळे. दोन्हींचा आम्ही सारख्याच उत्साहाने स्वीकार करीत असू. हा आमचा काळ मोठ्या आनंदात, चांगला व गमतीचा गेला.
नंतर शालेय आयुष्यात फावल्या वेळी मी रानावनात जाऊन खूप 'स्काऊट शिक्षण' घेतले. पक्ष्यांचे निरीक्षण करणे, जनावरांचे माग काढणे, ससे पकडून ते खाण्याकरिता शिजविणे, अशा अनेक प्रकारांनी माझे हे स्काऊट शिक्षण चालत असे.
पुढे लष्करात सामील झाल्यावर भारतात आणि आफ्रिकेत मोठी शिकार करण्याच्या अमर्याद गमतीचा आणि तसेच कॅनडामध्ये जंगलातील लोकांबरोबर राहण्याच्या आनंदाचाही लाभ मला मिळाला. दक्षिण आफ्रिकेतील लढाऊ मोहिमांच्या वेळी मला खरे 'स्काऊट' कामही करावयास मिळाले.
या सर्व जीवनापासून मला भरपूर समाधान आणि आनंद यांचा लाभ झाला. आपल्या देशातील मुलांनाही याचा थोड्याफार प्रमाणात लाभ का मिळू नये असे विचार माझ्या मनात आले. प्रत्येक निरोगी, सशक्त व उत्साही मुलाला साहसाची आणि उघड्यावरच्या मुक्त जीवनाची अत्यंत आवड व हौस असते हे मला माहीत होते आणि म्हणूनच ती आवड व हौस कशी भागवावी यासंबंधी मार्गदर्शन करण्याकरता मी हे पुस्तक लिहिले आहे; आणि तुम्ही मुलांनीसुद्धा इतक्या तत्परतेने
 त्याचा स्वीकार केला आहे की आज शेकडो, हजारों, नव्हे तर पन्नास लाखापेक्षा अधिक स्काऊट जगाच्या सर्व भागात निरनिराळ्या देशांतून पसरलेले आहे.
अर्थात रानावनातील जीवन पूर्ण कार्यक्षमतेने जगणे, काही मुलांना एकदम साधणार नाही. जंगलात राहताना माणसांना ज्या अनेक गोष्टी, आपल्या अंगच्या कसबाचा व अनुभवाचा उपयोग करून कराव्या लागतात, त्याचा अगोदर सराव केल्याखेरीज है रानावनातील सुखाने राहणे साधणारच नाही. या पुस्तकाचा तुम्ही नीट अभ्यास केलात तर त्या गोष्टी कशा कराव्यात यासंबंधीचे मार्गदर्शन तुम्हाला यात आढळेल. मग शिक्षकांशिवाय सुद्धा तुम्ही स्वतः हे शिक्षण घेऊ शकाल.
तुमच्या हेही ध्यानात येईल की कुशल व कार्यक्षम स्काऊटचे ध्येय केवळ मजा करणे आणि साहसाचा आनंद मिळविणे एवढेच कधीही नसते. ज्यांचे तुम्हाला अनुकरण करावेसे वाटते त्या संशोधक, रानात राहणाऱ्या आणि सरहद्दीवरच्या लोकांप्रमाणेच, आपल्या देशाविषयीचे आपले कर्तव्य आणि अडचणीत असलेल्या लोकांच्या उपयोगी पडणे, याकरता लागणारी पूर्व तयारी करणे, हेच स्काऊटचे खरे ध्येय आहे. जगातील सर्व थोर पुरुष हेच करीत असतात.
इतर मुलांची आणि मोठ्या माणसांची स्काऊटविषयी पुढीलप्रमाणे अपेक्षा असते. जो विश्वसनीय आहे. धोका व संकटे यांना न जुमानता, जो आपले कर्तव्य न चुकता व न कचरता पार पाडतो आणि कितीही अडचणी आल्या तरी देखील जो आनंदी व उत्साही वृत्ती कायम ठेवतो, अशी व्यक्ती म्हणजे स्काऊट.
अशा प्रकारचा चांगला स्काऊट तुम्ही व्हावे या विचाराने, त्याकरता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी या पुस्तकात दिल्या आहेत. म्हणून हे पुस्तक घ्या आणि वाचा. तुमच्या शिक्षणाकरिता यात दिलेल्या सर्व गोष्टींचा सराव करा. शिकवण आचरणात आणा. म्हणजे बालपणी स्काऊट म्हणून मला जो अमाप आनंद मिळाला, त्याच्या निदान निम्मा तरी आनंद तुम्हाला मिळेल अशी मला आशा आहे.      -बेडन पॉवेल ऑफ गिलवेल



जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत मध्ये स्काऊट - गाईड 
विभाग तर्फे लाॅर्ड ब्रेंडन पाॅवेल स्काऊट चळवळीचे जनक यांची जयंती व चिंतन दिन 
विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी लाॅर्ड ब्रेंडन पाॅवेल : जागतिक स्काऊट चे जनक या विषयावर व्याख्यान झाले.https://www.instagram.com/reel/DGXaHDhqXYC/?igsh=MWl0MTN5bm93d2NjNhttps://www.instagram.com/reel/DGXaHDhqXYC/?igsh=MWl0MTN5bm93d2NjNA==A==

Comments