श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल, जत महारांगोळीमध्ये जागतिक सहा पुरस्कार प्राप्त:
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत यांनी विश्वविक्रमी रांगोळी मध्ये जागतिक पातळीवर सहा विश्वविक्रम केल्याबद्दल
मा.श्री.शार्दुलराजे डफळे, अध्यक्ष,यल्लामा देवी प्रतिष्ठान,जत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.संदिप पाटील, चेअरमन, शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि., सांगली व मान्यवर उपस्थित होते.

🥇वर्ल्ड रेकॉर्ड युनायटेड किंग्डम⭐आसाम वर्ल्ड बुक रेकॉर्ड 🥉 एशिया वर्ल्ड रेकॉर्ड वरील जागतिक स्तरावर पुरस्कार प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.हा बहुमान श्री.सुभाष शिंदे हे म्हणतात "माझ्या दि फ्रेंडस् असोसिएशन जत चा व जत हायस्कूल,जत शाळेचा आहे.हे सर्व प्रमाणपत्र सन २०२१ प्राप्त झाली आहेत. माझ्या शिक्षक वृंद व माझ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा आहे. मला या.संस्थेत कै.तंगडी काका, चेअरमन श्री.ऐनापुरे काका,व डाॅ.श्रीपाद जोशी साहेब यांनी आणले.व्हा.चेअरमन श्री.स्वामी साहेब , डॉ.मदन बोर्गीकर साहेब, सर्व संचालक वृंद,व माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी., पर्यवेक्षक श्री.धायगोंडे साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment