ललित कला केंद्र चोपडा येथे २२कलाशिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ललित कला केंद्र चोपडा येथे दि. 5-12-2021 रोजी विधानसभेचे माजी अध्यक्ष मा. अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते जळगाव-चोपडा येथे राज्यस्तरीय 'आदर्श कलाशिक्षक प्रेरणा पुरस्कार '२२ कलाशिक्षकांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम 5500-/,स्मृतिचिन्ह,,सन्मानपत्र असेया पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कलासंचालयाचे निरीक्षक श्री, प्रा. संदीप डोंगरे,, कलासंचालयाचे माजी निरीक्षक श्री. भास्कर तिखे, , संस्थेच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाबेन गुजराथी, आखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक. कलाशिक्षक संघटनेचे सरचिटणीस श्री. एस. डी. भिरूड, , मा. मल्लिकार्जुन सिंदगी,, निवड समिती प्रमुख श्री. मोहन भोजपुरे, सौ. )हेमा धोत्रे, पंचायत समिती चोपडा गटशिक्षणाधिकारी सौ. डॉ. भावना भोसले, ललित कला केंद्राचे प्राचार्य श्री. राजेंद्र महाजन,श्री.शंशिकांत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण राज्यातून कमिटी नेमून. विनाप्रस्ताव राज्यातील 22कलाशिक्षकांना' त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत सदर पुरस्कार देण्यात आले.
Comments
Post a Comment