जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन!


आज दि.30डिसेंबर 2021रोजी जत हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जत तालुका ग्राहक मांचाचे अध्यक्ष, दैनिक केसरी चे वार्ताहर, टीव्ही.1या वृत्तवाहिनीचे संपादक मा. श्री. मनोहर पवार उपस्थितीत होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा ग्राहक मांचाचे उपाध्यक्ष मा. श्री. इब्राहिम नदाफ हे उपस्थिती होते.उपस्थित मान्यवरांनी ग्राहक चळवळ, ग्राहकांचे हक्क, ग्राहक कायदा याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक, श्री. ए. बी. होवाळे , ज्यु. कॉलेजचे विभागप्रमुख मा. श्री. नंदकुमार गुरव , वरिष्ठ लिपिक श्री. एम. ए. स्वामी , कला अध्यापक श्री. सुभाष शिंदे, ज्यु. कॉलेज चे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी -विद्यर्थिनी उपस्थित होते.

Comments