जगामध्ये प्रथम शाहीर कलेचा डफाचा आवाज साता समुद्रापार नेणारे शाहीर सम्राट, शाहीर बाबूराव विभूते यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन!!!!!!! तुम्ही ज्यावेळी वाहीली कलेचा विकास केला तेंव्हा पण आर्थिक परिस्थिती बेताची होती.त्यावेळी सर्व साथीदारांना बरोबर घेऊन एका कुटुंबप्रमुख म्हणून आप्पा काळजी घेत अस़तं.मी आप्पा शाहिरी कार्यक्रमासाठी माझ्या वडिलांबरोबर जात असे. आप्पा जेवण करताना पुढे पाट त्यावर जेवणाचे ताट असे व बसायला पाट कार्यक्रमात पाट नाही मिळाला तर हर्मोनियम ची पेटीचा बॉक्स असे.आप्पाचे जीवन शाहीर कलेसाठी जगणारा ऋषी होता!यांचा जन्मदिनी विनम्र अभिवादन!करून भागणार नाही तर त्यांच्या स्मृती बुधगावी शाहिर बापुराव विभुते यांच्या साहित्याचे भव्य शाहीरस्मृतीगंध स्थळ व्हावे हीच इच्छा!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏श्री.सुभाष शिंदे,बुधगाव

Comments