श्री.सुभाष शिंदे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार-२०२१जाहीर

*श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत* *हायस्कूल,जत यांना राज्यस्तरीय गुणवंत* *शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न* *पुरस्कार-२०२१यांना जाहीर....*
जत:जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.ता.जत जिल्हा-सांगली येथील कलाशिक्षक, सहशिक्षक:श्री.सुभाष सदाशिव शिंदे यांना 
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार-२०२१जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार दि.२४ऑक्टोबर २०२१रोजी ऑनलाइन द्वारे
पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
   श्री.शिंदे यांनी शैक्षणिक, सामाजिक, शालेय स्तरावर विविध प्रयोग, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती-सुमारे२५०वरती आहेत.
स्काऊट-गाईड जिल्हा, राज्यस्तरीय विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्काऊट राज्य पुरस्कार मध्ये शाळेतील स्काऊट, गाईड याना पुरस्कार प्राप्त करून दिला.सांगली जिल्हा परिषद व सांगली जिल्हा भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय, सांगली आयोजित जिल्हा मेळाव्यात सात वेळा ॲडव्हान्स पार्टी लीडर म्हणून यशस्वी पणे कामकाज केले आहे.ते जिल्हा अर्थ सदस्य म्हणून कामकाज पहिले.
 श्री शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी-२०१९भव्य रांगोळी प्रात्यक्षिक सादरीकरण सात दिवस सहभागी होऊन त्यांना विश्वविक्रम विविध सहा वर्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्राप्त आहेत.
श्री.सुभाष शिंदे हे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई, स्विकृत सदस्य म्हणून निवड झाली ,ते कथामालेचे , सेवादलाचे पण काम करतात.
 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे,येथे इयत्ता-११वी/१२वी विषय क्रमांक-५७ कलाशिक्षण या हस्तपुस्तिका मध्ये लेखक मंडळ सहभागी होऊन लेखन, रेखाटन केले आहे.
सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे, कार्यवाह, साने गुरुजी कथामाला/सेवादल -संघटक म्हणून कामकाज पाहतात.
लायन्स क्लब जत चे सदस्य म्हणून विविध उपक्रम राबविले आहेत.
  श्री.शिंदे यांना विविध जागतिक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा विविध अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.सरांचे हार्दिक अभिनंदन!व
कार्याला हार्दिक शुभेच्छा!!!!

Comments