मला भेटलेले ज्ञानयोगी: डॉ.श्रीपाद जोशी,जत.
जत हायस्कूल,जत ला शैक्षणिक आदर्श जडणघडण लावण्याचे
काम डॉ.श्रीपाद जोशी साहेब यांचा वाटा सिंहाचा आहे.आदर्श
संस्था चालक या संगम झाल्यामुळे शाळेची आज वैभवशाली
परंपरा आज जत नगरीला पाहण्यास मिळते आहे!!!!!
जत नगरीला साने गुरुजी यांचा वसा घेतलेले व सेवादल चै
सैनिक, सुंदर आणि सुंदरच अक्षर लेखनाची देणगी लाभलेले!
साहेबांच्या भेट: मुक बधिर विद्यालय,जत येथे कलाशिक्षक म्हणून
सन-१९८८साली सेवेत होतो.एक पत्र टेबलावर दिसले. सुंदर
अक्षरातील पत्र ! हे पत्र कुणी लिहिले आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदम सरांनी मला डॉ.जोशी साहेबांचा सर्व
माहिती सांगितली.आणि त्याच दिवशी भेट घेतली.
. मला माझे जतचे साने गुरुजी भेटले.मी त्यानंतर दररोज त्यांची
भेट होतो. मुक बधिर विद्यालय,जत चे डॉ.श्रीपाद जोशी, साहेब
संचालक व शैक्षणिक मार्गदर्शक होते.मी तर त्यांच्या कडून खूप
मुक बधिर विद्यालय, जत नंतर मी मुंबईत दैनिक सामना कला विभागात काम केले.माझ्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे मला
परत सांगलीला यावे लागले.वडिलांची सर्व उपचार केले.मी परत
मुंबई ला जाण्याच्या विचारात होतो.पण मला नोकरीची गरज होती. मला जत हायस्कूल,जतला कलाशिक्षक जागा आहे.मला
मा.श्री.म.ल.देसाई, साहेब.मा.श्री.भोसले साहेबांनी सांगितले.मला
आनंद झाला.जत हायस्कूल,जत चे मुख्याध्यापक मा.डाॅ.श्रीपाद जोशी, साहेबांची माझी छान ओळख होती.संस्थाचालक मा.श्री.तंगडी काका,मा.श्री.ऐनापुरे काका,साहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केले.दि फ्रेंडस असोसिएशन,जत ही संस्था जगापेक्षा वेगळी
प्रत्येक व्यक्ती वर कुटुंबाप्रमाणे लक्ष देवून शैक्षणिक कार्य करीत आहे.या संस्थेचे कार्य महान आहे.त्याला माझा सलाम !
डाॅ.श्रीपाद जोशी , साहेब आणि माझं नातं:
मी जत मध्ये आलो तेंव्हा पोस्टर स्पर्धा, सांगली माझा प्रथम क्रमांक-५००/-बक्षिस घेऊन जतला आलो. मला जत मध्ये कोणीच ओळखत
नव्हते .. डॉ.जोशी साहेबांना सांगितले माझ्याकडे फक्त ५००/-आहेत.माझ्या घराकडून एक पैसा मिळणार नाही.मग जत मध्ये कसं होईल.सुभाषराव मी आहे ना! असे म्हणून त्यांनी ५००/-नोट माझ्या खिशात घातली ही माया पाहून डोळ्यात पाणी आले आणि
ठरविले !आता नाही थांबायचे....! शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली.....!
मला डॉ.जोशी साहेब यांचे बोलणे खूपच छान!त्यांनी
शाळेचे काम सांगितले की नाही असा शब्द माझ्या कडून
कधी ही गेला नाही.ते प्रेमळ होते शिवाय नम्रता यामुळे
ते सर्वत्र आदरणीय आहेत.शिस्त ही एकच टाळी वाजली
की विद्यार्थी , विद्यार्थिनींनी पासून सारेच दक्ष!
नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल
तेंव्हा त्यांच्या खूपच अभ्यास असे!
कलाशिक्षक:श्री. सुभाष शिंदे
विद्यार्थी,विद्यार्थिनींनीचे रेखाटन,रंगकाम सुधारणा करण्याचे
उद्दिष्ट दोन वर्षे विविध प्रयोग राबविले . शाळेमध्ये, निसर्गामध्ये
प्रत्येक्ष रेखाटन सराव करून घेतला.
विविध स्पर्धेत सहभाग घेतला.माझी शाळा, तालुका, जिल्हा, राज्य
राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभाग, बक्षिसे मिळाली.त्यामुळे सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनीना आवड निर्माण झाली.एक विशेष घटना घडली! आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत महेश चव्हाण यांनी काढलेला खो-खो खेळणारी मुले या कलाकृती ची चित्र प्रदर्शनात
निवड झाली.
प्रत्येक शैक्षणिक वर्ष एक कला प्रदर्शन:माझा संकल्प!
प्रजासत्ताक दिनी, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ,
या कालावधीत चित्र,हस्तकला, हस्तलिखित,माझे व्यक्तिगत
कला प्रदर्शन,पालक बंधु भगिनींचे विविध प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन अशी विविध उपक्रमांची प्रदर्शने भरवली.
त्यातील काही निवडक कलाकृती प्रदर्शने :
१) राष्ट्रीय एकात्मता चित्र प्रदर्शन:श्री.सुभाष शिंदे.
२) विद्यार्थी, विद्यार्थिनींचे भव्य चित्रकला स्पर्धा व
प्रदर्शन.
३) व्यंगचित्र ५००कलाकृतीचे प्रदर्शन: सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी.
Comments
Post a Comment