विभागीय ऑनलाइन सभा

विभागीय ऑनलाईन मिटिंग:
        महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ अंतर्गत कोल्हापूर विभागीय( कोल्हापूर, सांगली, सातारा) कलाध्यापक पदाधिकाऱ्यांची सभा व्ही.सी. द्वारे नुकतीच पार पडली या सभेत एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट शासकीय ग्रेड परीक्षा तातडीने  घेण्यासाठी कलासंचालनालयाकडे  पाठपुरावा करणे, राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत कलाशिक्षक आणि कला विषय सक्तीचा करावा, कला - क्रीडा विषय बंद पाडण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी कला शिक्षकांनी संघटीत व्हावे.पावित्र पोर्टल द्वारे कला शिक्षकांचीही भरती व्हावी. कला शिक्षकांची  विषेशशिक्षक म्हणून   संचमान्येतेत नोंद व्हावी. वेतनश्रेणी, कलाशिक्षकांचे राज्यअधिवेशन व पुरस्कार वितरण, सेवानिवृत्त कला शिक्षकांचा गौरव, कलाशिक्षक, कलाशिक्षण,विद्यार्थी आणि कलाशिक्षक संघटना यांची धोरणात्मक वाटचाल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष पी.आर. पाटील होते.राज्य सरचिटणीस एम.ए.कादरी प्रमुख उपस्थित होते. स्वागत कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी तर प्रास्ताविक  विभागीय  उपाध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी केले. राज्य उपाध्यक्ष दादासाहेब भगाटे, राज्य महिला अध्यक्षा प्रियवंदा तांबोटकर यांनी यांनी मार्गदर्शन केले.कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष संजय सुतार, सांगली जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी आणि सातारा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी आपापल्या जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा सादर केला. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळातर्फे कला संचनालय मुंबई, संबधीत मंत्रीमहोदय यांच्याकडे ग्रेड परीक्षां तातडीने घेण्याबाबत निवेदन सादर करून पाठपुरावा केला जावा अशी मागणी कोल्हापूर कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केली. राज्य अध्यक्ष पी.आर पाटील यांनी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले,कलाशिक्षकांनी ग्रेड परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्याची  नोंदणी करुन परीक्षेची तयारी करून घ्यावी, शासनाला परीक्षा घेण्यास भाग पाडू असा विश्वास राज्य उपाध्यक्ष दादा भगाटे यांनी व्यक्त केला.
  कोल्हापूर , सांगली सातारा  या जिल्ह्यातील कलाध्यापक संघाच्या कामकाजाबद्दल महामंडळ पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेच्या कामकाजाबाबत तसेच कला विषय आणि कला शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा झाली.राज्य सरचिटणीस एम.ए.कादरी यांनी मार्गदर्शन केले. राज्य महिलाध्यक्ष प्रियवंदा तांबोटकर यांनी महिला कला शिक्षिकांनी पूढे येण्याचे अवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यात कार्यशिक्षण विषयांतर्गत चित्रकला आणि रंगकाम अभ्यासक्रम ठेवला असून, कला शिक्षकांच्या विविध प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदनाद्वारे अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी माहिती कार्याध्यक्ष संजय सुतार यांनी दिली.
 बोगस संगीत अकॅडमीवर कारवाई करून, रेखाकला परीक्षेचे गुण वाढवावेत. अशी मागणी श्रीकांत माळी यांनी केली.  चित्रकला स्पर्धांचे आयोजन, विविध कलात्मक उपक्रम राबविणे, कला शिक्षकाच्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. अशी माहीती सातारा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.
सभेस सुभाष शिंदे, रोकडे,  विकास शेवाळे,प्रसिद्धीप्रमुख सुनिल खोत, स्वाती वाघमोडे, नीता सुतार,सायली कुंभार, स्वरूपा पाटील, मनीषा काळे,  वंदना हुलबत्ते आदी उपस्थित होते. नरेंद्र बारई यांनी आभार मानले

Comments