जत तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्षपदी संजीव नलवडे यांची निवड... !
निवड करण्यात आली. तसेच कार्यवाहपदी श्री.सुधीर उबाळे-श्री बसवेश्वर हायस्कूल,बिळूर यांची निवड करण्यात आली. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे संलग्नित सांगली जिल्हा कलाध्यापक संघाची ऑनलाईन बैठक घेऊन त्यामध्ये जिल्हाध्यक्ष मा.श्रीकांत माळी,उपाध्यक्ष मा.राजा ठोके, जिल्हा-कार्यवाह मा.सुभाष शिंदे व मा.संजय रोकडे,कार्याध्यक्ष मा.मोहन दिंडे,वाळवा तालुका अध्यक्ष मा.संतोष ढेरे याबरोबरच इतर जिल्हा पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी होऊन जत तालुका कार्यकारणी जाहीर केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक मा.एस.बी.भोसले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कलाध्यापक संघाच्या माध्यमातून कलाविषय व कला शिक्षकांसमोरील आव्हाने, प्रश्न-समस्या शासन व संस्था पातळीवर मांडून न्याय मिळवून देण्यासाठी कायम कटीबद्ध आहोत, असा ठाम विश्वास व्यक्त केला. सत्कारप्रसंगी श्री. बी.टी.सोनवणे सर, श्री.आर.पी.भोसले सर, एन.एम.सूर्यवंशी सर, तसेच प्र.मुख्याध्यापक श्री. आर. टी. कोळी सर, श्री. ए.के. कळसकर सर उपस्थित होते. या संवाद बैठकीचे संयोजन व सत्कार समारंभाचे प्रास्ताविक मा.सुभाष शिंदे यांनी केले व आभार मा.सुधीर उबाळे मानले.
Comments
Post a Comment