काव्य छटा : जीवन माझे(डॉ.श्रीपाद जोशी यांच्या सेवानिवृत्त प्रसंगी ज्ञानयज्ञ गौरव ग्रंथ मध्ये काव्य छटा )
जीवन माझे
जीवन माझे शाळेसाठी !
गातो तीचे हे गान ||धृ ||
पुण्य भूमी ही जत नगरी
आहेत जोशी सर महान
अनेक वर्षांची मैफल
रंगली छान ||१||
फ्रेंडस् असोसिएशन संस्था प्रेमळ
येथेच रमळी अनेक मंडळी
नवरत्नांची खान
सांगतो तुम्हांला तीचे गान ||२||
साने गुरुजींचा वसा मनी
ध्यास त्यांनी घेतला कर्तव्यदक्ष राहून,
जत हायस्कूल ज्ञानकोश भरला
या ज्ञानाची ओंजळ पिऊन
धनत्रयोदशी झालो आम्ही सर्वजण ||३||
सुंदर लेणी अक्षरांची
साथ दिला सरांनी
या लेण्यांची छाप पडली
ओळख त्या शाळेची,
ही किमया जोशी सरांची ||४||
प्रेमळ वाणी वसे नम्रता
असे आचरण सदैव त्यांचे
वाटे आईह्रदयी समभाव
वाजे टाळी सदैव त्यांची
त्या टाळीने जीवन घडे
आम्हां शिकविले त्यांनी ||५||
व्याख्यानमाला वा कथामाला
अनेक कार्यक्रमांमध्ये,असे सुनियोजन
बनले वक्ते ,बनले कवी
आम्ही त्यांच्याच प्रेरणेने ||६||
उदंड जीवन त्यांना मिळो ,हीच मनाची कामना
अमृतवाणी अविट गोडी,राहु देआमच्या मनी
त्रिवार वंदन करतो आता ,पुरे करतो काव्यपुष्पे,
जीवन माझे शाळेसाठी ,गातो तीचे गान ||७||
-श्री.सुभाष शिंदे,जत.
Comments
Post a Comment